बंधारे पुन्हा पाण्याखाली पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

गेल्या आठ दिवसात कोल्हापूर जिल्ह्यासह धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाटाने वाढ झाली आहे. यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा नदीवरील शिरोळ तेरवाड आणि कृष्णा नदीवरील कनवाड राजापूर वाडी हे चार बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.त्यामुळे बंधाऱ्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू करण्यात आली आहे.गेली अनेक दिवस उसंत खाललेल्या पावसाने गेल्या आठ दिवसापासून पुन्हा दमदार हजेरी लावली विशेषता धरण व पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू झाला आहे गेल्या आठ दिवसात शिरोळ तालुक्यातही दमदार पाऊस झाला आहे यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा,कृष्णा,पंचगंगा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.शिरोळ तालुक्यातील पंचगंगा आणी कृष्णा नदीची पाणी पातळी वाढत असल्यामुळे पंचगंगा नदीवरील शिरोळ,तेरवाड हे बंधारे तर कृष्णा नदीवरील कनवाड आणी राजापूरवाडी हे चार बंधारे पुन्हा पाण्याखाली गेले आहेत.यामुळे या बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक थांबली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू झाली आहे.पाणीपातळी वाढल्यामुळे नदीकाठची मळी पाण्यात गेली असल्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न बिकट बनला आहे.
सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.पावसामुळे विशेषता भुईमूग सोयाबीन या पिकांना कोंब येण्याची शक्यता निर्माण होऊन या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.याचा फटका शेतकऱ्यांना बसून त्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे.काढणीला आलेल्या पिकांच्या सरीत पाणी साचून राहिले आहे.यामुळे भाजीपाला फळभाज्या कुजून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे.

error: Content is protected !!