इचलकरंजी / प्रतिनिधी
साखर कारखान्यांसमोर अनेक समस्या आणि अडचणी असतानाही ‘जवाहर’ ने त्यातूनही मार्ग काढत ‘माईलस्टोन’ तयार केले आहेत.एकरी 20 टनाच्या आता उत्पादन असणार्या शेतकर्यांचे गावनिहाय मंडळ तयार करुन उत्पन्न वाढीसाठी शास्त्रोक्त शेतीसाठी प्रोत्साहित केले जाईल.कारखान्याने नेहमी शेतकर्यांचे हित जोपासले असून यंदाच्या ऊस गळीत हंगामात 20 लाख टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे, असे प्रतिपादन कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे ज्येष्ठ संचालक आमदार प्रकाश आवाडे यांनी आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे होते.यावेळी आमदार आवाडे पुढे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी कारखाना उभारणीपासून आजतागायत शेतकर्यांचे हित जोपासले आहे.ऊस विकास योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांच्या बांधापर्यंत जात विविध प्रयोग आणि उपक्रमांच्या माध्यमातून उत्पन्न वाढीसाठी सहकार्य केले आहे.ड्रोनद्वारे औषध आणि खते फवारणी करणारा जवाहर कारखाना हा देशातील पहिला साखर कारखाना ठरला आहे. प्रती एकर 300 अशा अल्पदरात ही फवारणी करुन दिली जात आहे.गतवर्षी चुकीच्या वेळी झालेल्या आंदोलनामुळे एक महिना हंगाम लांबल्याने कारखान्याचे पर्यायाने शेतकर्यांचे प्रचंड नुकसान झाले.यंदाही पावसामुळे हंगाम लवकर सुरु होणार की नाही असा प्रश्न होता.मात्र कर्नाटक राज्याने 15 नोव्हेंबर पासून हंगाम सुरु करण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने महाराष्ट्रातही त्याचवेळी कारखाने सुरु होण्याबाबतचा निर्णय मंत्री कमिटीने घेतला आहे.त्यामुळे गाळप आणि उत्पादन वाढवून शेतकर्यांचा चांगला दर देता येईल असा प्रयत्न सुरु आहे. कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या संकल्पनेतून ऊस विकास योजना राबविणारा हा एकमात्र कारखाना आहे.यंदा पूरग्रस्त भागातील ऊस तोडणीसाठीचे स्वतंत्र नियोजन केले असून सभासदांनी जास्तीत जास्त ऊस पाठवून सहकार्य करण्याचे आवाहन केले.कारखान्याने कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांनी नोटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले.सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजूरी दिली.आभार व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले यांनी मानले सूत्रसंचालन सुभाष गोटखिंडे यांनी केले. सभेस उत्तम आवाडे,प्रकाश दत्तवाडे,स्वप्निल आवाडे,डॉ.राहुल आवाडे,सुधाकर मणेरे,संचालक आदगोंडा पाटील,सुकुमार किणींगे,अभयकुमार काश्मिरे, दादासो सांगावे, सुरज बेडगे,शितल आमण्णावर, संजयकुमार कोथळी, गौतम इंगळे,सुमेरु पाटील,सौ. कमल पाटील,सौ.वंदना कुंभोजे,आण्णासो गोटखिंडे, जिनगोंडा पाटील आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, कारखान्याचे सभासद,पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.