इचलकरंजी येणाऱ्या विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून मी निवडणूक लढवणार आणि जर जनतेने मला कौल दिला तर येणाऱ्या चार महिन्यांमध्ये इचलकरंजी शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष विठ्ठल चोपडे यांनी सोमवार एका बैठकीत दिली असल्याची माहिती दिली.यावेळी चोपडे म्हणाले मी इचलकरंजी विधानसभा निवडणुकीसाठी आमचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे उमेदवारी मागणी असून मला खात्री आहे की महायुती कडून मीच उमेदवार असणार आहे. इचलकरंजी शहराचा प्रश्न कित्येक वर्ष भिजतच आहे. विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांनी पाण्याचा प्रश्न गांभीर्याने कधी घेतला नाही त्यामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.जर इचलकरंजी जनतेने मला निवडून दिले तर येणाऱ्या चार महिन्यांमध्ये इचलकरंजीचा पाण्याचा प्रश्न मी सोडवेल पाण्यासंदर्भीय संपूर्ण अभ्यास मला असून इचलकरंजी विधानसभेला चांगला उमेदवार मिळेल अशी अपेक्षा ही चोपडे यांनी व्यक्त केली.चोपडे यांच्या त विधानाने महायुतीचे घटक पक्ष असलेले विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या अडचणी वाढणार आहेत.