“अखेर जल आंदोलन मागे” पण पाण्याच्या टाकीवर चढुन उग्र आंदोलनाचा इशारा

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

 

दानोळी येथील डोंगरालगत शेरी नावाने परिचित असलेल्या शिवारात पक्या पद्धतीचा बंधारा बांधण्यात यावा व राज्यातील कारखान्यांनी उसाचा तोडणी वाहतूक खर्च सरासरी ऐवजी किलोमीटरच्या अंतरानुसार आकारावा या प्रमुख मागण्यासाठी आज गुरुवार दिनांक 19 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून आंदोलन अंकुश कडून सुरु केलेल जलसमाधी आंदोलन शासनाच्या लेखी आश्वासना नंतर मागे घेण्यात आले.

प्रादेशिक साखर सहसंचालक गोपाळ मावळे म्हणाले वाहतूक तोडणी खर्च अंतरानुसार आकारण्यात यावा यासंबंधी शासनास पाठपुरावा सुरू आहे.धोरणात्मक निर्णय असल्याने यावर राज्य सरकार तोडगा काढेल संबंधित विभागांना याबाबत माहिती कळली आहे.

वनपाल संजय कांबळे म्हणाले जलसंधारण विभागाचा प्रस्ताव आमच्या विहित नमुन्यात कार्यालयास प्राप्त झाल्यास तत्काळ ना हरकत दाखला वनविभागाकडून दिला जाईल. यावेळी आंदोलनकर्त्यांनी नदी मार्गावरील गावच्या वेशीवर थांबवण्यात आले होते.आंदोलन अंकुशसोबत सकारात्मक चर्चा करण्यात आली.दरम्यान जल आंदोलन रोखण्यासाठी नदी मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

जलसंधारण विभाग उपअभियंता योगेश पोळ म्हणाले बंधाऱ्यांची जागा मी स्व:ता जाऊन बघीतली सर्वेक्षण फायनल करून दिले आहे. त्या अनुषंगाने १ कोटी ९२ लाखाचे इस्टिमेट तांत्रिक मान्यतेसाठी पाठवले आहे.निधीची कोणतीच अडचण येणार नाही.

तहसिलदार अनिलकुमार हेळकर म्हणाले प्रादेशिक साखर सहसंचालक यानी अंदोलन करत्याची मागणी शेतकर्‍याच्या हिताचा आहे.तरी मागणीचा पाठपुरावा घेऊन शासन दरबारी लवकरात लवकर जलसंधारण विभाग,वन विभाग पाठपुरावा करुन काम मार्गी लावतील.यावेळी आमच्या दोन्ही मागण्याचा 15 दिवसाच्या मुदतीत पाठपुरावा करुन शासन दरबारी कामाची पुरता नाही झाली.लेकी आश्वासन पाळले नाही तर 16 व्या दिवशी गावातील पाण्याच्या टाकीवर चढुन तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा आंदोलन अंकुशचे उदय उगले यांनी सांगितले.अखेर सकाळी 11 वाजल्यापासून सुरू झालेले जल आंदोलन शासनाच्या लेखी आश्वासनानंतर आज गुरुवार दिनांक 19 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता मागे घेण्यात आले आहे.यावेळी जनसंधारण विभागाचे उप अभियंता योगेश पोळ, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके,उप अभियंता विलास भिसे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!