सदलगा हायटेक बस स्थानकांत खड्ड्याचे साम्राज्य
सदलगा / प्रतिनिधी
अद्यावत बसस्थानकामध्ये सदलगा बस स्थानकाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.या शहरातून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या कार्यरत असताना,अलीकडेच सर्व सोयी नियुक्त असे बस स्थानक तयार
केले असून,लोकार्पण सोहळा मात्र तसाच एक-दोन वर्षापासून वंचित राहिला आहे.मात्र या बस स्थानकावर काँक्रिटीकरणाचे काम गेले दोन वर्षापासून अर्धवट स्थितीत असून हायटेकच्या
नावाखाली चालणारे हे बस स्थानक खरोखर खड्ड्याचे साम्राज्य बनले आहे.सर्वत्र चिखल पसरल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.या सदलगा शहराच्या बसस्थानकावर अलीकडे दोन
दिवसात झालेल्या पावसामुळे भरपूर पाणी साचले असून प्रवाशांना त्या पाण्यातून बसपर्यंत जावे लागत आहे.यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असून चिकोडी तालुक्यातील
संबंधित खात्याला याविषयी वेळोवेळी सूचना देण्यात आलेली असताना देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का करण्यात येत आहे? हे मात्र सदलगा शहरातील प्रवाशांना न समजलेले कोडे
आहे.चिकोडी तालुक्यातील विद्यमान आमदार व खासदार या दोन्ही लोकप्रतिनिधीनी प्रयत्न करून हे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे,चिखलमुक्त बस स्थानक करावे आणि प्रवाशांना
सोयीचे करावे असे जनसामान्यातून बोलले जात आहे.
खरोखरच जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मत जर लोकप्रतिनिधींना वाटत असेल तर कोणत्याही परिस्थितीत येत्या
महिन्याभरात बस स्थानकाचे कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण करावे.आणि सीमा भागातील नावाजलेले हायटेक बस स्थानक अद्यावत करावे आणि लोकांचा दुवा घ्यावा असे सर्व सामान्य प्रवाशातून बोलले जात आहे.