मौजे आगरमधील मोफत आरोग्य तपासणी शिबिरात उस्फूर्त प्रतिसाद
शिरोळ / प्रतिनिधी
सध्याच्या धाकधुकीच्या वातावरणात आपली जीवनशैली बदलत चालले आहे याचा आरोग्यावर विपरीत परिणाम होत असतो.त्यामुळे व्यस्त जीवनशैलीत सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने प्रत्येकाने सजग असले पाहिजे असे मत माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूरचे प्रमुख डॉ अभिजीत माने यांनी व्यक्त केले.मौजे आगर येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर विजयसिंह पाटील शिक्षण प्रसारक मंडळ व शिवनेरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मौजे आगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराप्रसंगी डॉ माने हे बोलत होते. जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा डॉ सौ नीता माने शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.माने केअर हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करत लागणारी औषधे वैद्यकीय सल्ला दिला.
स्वागत विद्यालयाच्या अध्यापिका सौ जयश्री पाटील यांनी केले.रोटरीचे सचिव मेजर प्रा के एम भोसले यांनी प्रास्ताविक केले.ट्रेझरर चंद्रकांत भाट माजी सरपंच अमोल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष शहाजीराव दाभाडे,संचालक विलास पाटील,रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष तुकाराम पाटील,इव्हेंट चेअरमन अमित जाधव,सदस्य डॉ अरविंद माने,डॉ अजितकुमार बिरनाळे,गजानन पाटील, विक्रमसिंह भोसले, संजय शिंदे,भरत गावडे,माजी नगरसेवक एन वाय जाधव,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम पाटील, फत्तेसिंह मोरे,सर्जेराव पवार, सिद्धार्थ कांबळे, अभिषेक ढोकळे, सौ तांबोळी, डॉ प्रल्हाद भोगम, चेतन व्हनखंडे, रोहित सुतार यांच्यासह शाळेचे विद्यार्थी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभारप्रदर्शन व सूत्रसंचालन नितीन बागुल यांनी केले.