जहॉंगीर रणमल्ली यांना आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

दत्तवाडचे सुपुत्र व इंडियाचा आवाज या चॅनेल चे धडाडीचे व निर्भीड पत्रकार जहाँगीर महेबूब रणमल्ली यांची पुणे येथील आघाडीची वृत्तसंस्था न्यूज एक्सप्रेस तर्फे दिल्या जाणाऱ्या आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी निवड जाहीर झाली आहे.सदरचा पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे ७ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.
सर्वसामान्यांच्या व्यथा व प्रश्नांना आपल्या लेखणीद्वारे मांडून न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न जहाँगीर महेबूब रणमल्ली यांनी केला आहे.पत्रकारितेबरोबरच सामाजिक कार्यात ही उल्लेखनीय कार्य करीतआहे.त्यांना हा पुरस्कार जाहीर झालेबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

error: Content is protected !!