‘आप’ पक्षाच्यावतीने फटाक्याची आतषबाजी व नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आली होती.सदर प्रकरणांमध्ये कोर्टाने इडी व सीबीआय यांच्या कार्यपद्धतीवर कठोर निरीक्षणे नोंदवत जामीन मंजूर केला.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी जामीन मिळाल्यामुळे आम आदमी पार्टी शिरोळ तालुका व जयसिंगपूर शहर यांच्यावतीने क्रांती चौक जयसिंगपूर येथे फटाक्याची आतषबाजी करून तसेच नागरिकांना साखर वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.अशी माहिती आपचे कोल्हापूर जिल्हा संघटक सुदर्शन कदम यांनी दिली.कदम पुढे म्हणाले सत्ताच्या विजय झाला आहे भाजप सरकार हुकूमशाही करत असून आमचे नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोर्टाने जमीन मंजूर केल्याने भाजप सरकार विरुद्ध एक मोठा विजय आहे. यावेळी सागर म्हेतर,जयंतीलाल पटेल,इकबाल सुदरने, बाळासो कडोले,विशाल कांबळे,शंकर कदम, विजयकुमार चौगुले आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!