महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी आता निकाली निघणार – आमदार यड्रावकर

Spread the love

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कोल्हापूर-सांगली जिल्ह्याला भेडसावणारा महापुराचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारने मोहीम गतिमान केली आहे.सरकारने जागतिक बँकेकडून यासाठी लागणारा कोट्यवधी रुपयाचा निधी उचलण्याचे धोरण अवलंबले आहे.महापुराचे पाणी लवकरच दुष्काळी भागाकडे वळवण्याच्या दृष्टीने तांत्रिक कामकाजाला सुरवात होणार आहे.त्यामुळे महापुराचा प्रश्न कायमस्वरूपी आता निकाली निघणार असल्याचे प्रतिपादन आम.डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केले.
कुरुंदवाड-भैरववाडी येथील मराठा दैव मंडळ सांस्कृतिक हॉल,मुस्लिम समाज सांस्कृतिक भवन स्लॅब शुभारंभ आदी विविध विकास कामांच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात आम.डॉ.पाटील-यड्रावकर बोलत होते. मुख्याधिकारी टीना गवळी,माजी नगराध्यक्ष जयराम पाटील,रामचंद्र डांगे,रावसाहेब पाटील, दादासाहेब पाटील, जवाहर पाटील,मराठा दैव समाजाचे अध्यक्ष रमेश भुजुगडे आदी प्रमुख उपस्थित होते.पुढे बोलताना आम.डॉ.पाटील यड्रावकर म्हणाले समाजातील उजवल भविष्यातील नवीन पिढी घडवण्यासाठी सामाजिक-सांस्कृतिक हॉलचा-सभागृहाचा उपयोग व्हावा यादृष्टीकोनातून कार्यालयांची निर्मिती केली आहे. भविष्यात हे कार्यालय म्हणून मर्यादित न राहता ही अभ्यासकेंद्र म्हणून नावारूपास येईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.विकास कामाचे माहिती मुख्याधिकारी टीना गवळी, पालिकेचे अभियंता प्रदीप बोरगे यांनी दिली,स्वागत अध्यक्ष भुजुगडे,प्रास्ताविक डॉ.सुनील चव्हाण कार्याचा आढावा रामचंद्र मोहिते यांनी दिला.आभार दिलीप येवले,श्रीकांत चव्हाण यांनी मानले.
आम.डॉ.पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या निधीतून मराठा मंडळ भैरवावाडी सांस्कृतिक हॉल यासाठी 2 कोटी, म्हाबूब सुभानी दर्गा पायाभरणी 50 लाख, एस के पाटील कॉलेज परिसर रस्त्यासाठी 15लाख, मुस्लिम समाज सांस्कृतिक भवन 55 लाख, भैरववाडी रस्ता व गटर कामासाठी 35 लाख अशा 3 कोटी 55 लाख रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आम.डॉ.पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे,विजय पाटील बि.डी.सावगावे,विजयनाना भोसले,धनपाल आलासे, महिपती बाबर,पांडुरंग मोहिते,राजेंद्र बेले,बबलू पवार, रणजीत डांगे,चंद्रकांत पोवार,उदय डांगे,सुरेश बिंदगे,नायकू दळवी,अरुण आलासे,जवाहर पाटील, अक्षय आलासे, दीपक गायकवाड,सचिन मोहिते,सोमेश गवळी,अजित देसाई,भीमराव यादव,शिवाजी रोडे आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!