मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांची टाकवडे शैक्षणिक संकुलास भेट

Spread the love

मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांची टाकवडे शैक्षणिक संकुलास भेट

ग्रामस्थ,पालक,शिक्षक व प्रशासनाचे केले कौतुक.

शिरोळ / प्रतिनिधी

 

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र. २ मधील उपक्रमात शिरोळ तालुक्यात शासकीय शाळांत प्रथम आलेल्या कुमार विद्या मंदिर टाकवडे या शाळेत जिल्हास्तरीय मूल्यमापनासाठी पथक आले होते. त्यावेळी टाकवडे शाळेच्या यशामध्ये ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामस्थ,पालक,शिक्षक व प्रशासन यांचा मोलाचा वाटा आहे. विशेष करुन शाळेतील शिक्षक वर्ग व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी व प्रशासन यांची कामगिरी मोलाची आहे.त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे असे गौरवोद्गार कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी काढले.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्र.२मधील शिरोळ तालुक्यात प्रथम आलेल्या कुमार विद्या मंदिर टाकवडे शाळेने राबविलेल्या विविध उपक्रम पाहून समाधान व्यक्त केले.शिरोळ तालुक्यातील शैक्षणिक कामकाज पाहून गट शिक्षण अधिकारी सौ.भारती कोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला.याप्रसंगी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी यादव साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी रवी कांबळे,डाएटचे अधिव्याख्याता महादेव वांडरे,शिक्षण विस्तार अधिकारी आर.व्ही.कांबळे,दिपक कामत,अनिल ओमासे,एन.व्ही.पाटील,चित्रगार सर,गटनेते अमोल चौगुले,मनोज चौगुले,उपसरपंच अर्शद मुल्ला, केंद्रप्रमुख सुरेश कांबळे,आण्णा मुंडे,प्रकाश खोत,ग्राम पंचायत सदस्य बाळासाहेब कदम,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष इरफान मुल्ला,ग्रामविकास अधिकारी विलास फोलाणे,मुख्याध्यापक अरुण कदम व शिक्षक स्टाफ उपस्थित होते .

error: Content is protected !!