पु.शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
गेले सहा दिवस मांगल्य आणि चैतन्याने भरलेल्या घरातील सुखकर्ता गणपती बाप्पांना गुरुवारी पुलाची शिरोली मधील गणेश भक्तांनी भावनिक वातावरणात ‘मोरया’च्या गजरात निरोप देण्यात आला. गणरायाची अखेरची आरती झाल्यानंतर चुरमुरे-खोबऱ्याची उधळण करत लाडक्या बाप्पांच्या परतीचा प्रवास शिरोलीकरांनी डोळ्यात साठवला. ‘बाप्पा चालले आपुल्या गावाला… चैन पडेना आमच्या मनाला’ या ओळीतील भावना प्रत्येकाच्या मनात दाटून आल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशी साद घालत ढोल-ताशे, साऊंड सिस्टम लाईट शो च्या धूम धडाक्यात बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.ग्रामपंचायत शिरोलीच्या वतीने गणपती मूर्ती दान करून घेतले लोकनियुक्त महिला सरपंच सौ. पद्मजा कृष्णात करपे उपसरपंच बाजीराव पाटील ग्राम विकास अधिकारी एस. वाया कदम माजी उपसरपंच कृष्णात करपे ग्रामपंचायत चे सर्व सदस्य सदस्य प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पंचगंगा पाणीपुरवठा चे सर्व पदाधिकारी यांनी मूर्ती दान केल्या यावेळी ग्रामविकास अधिकारी एस.वाय .कदम माजी उपसरपंच कृष्णात करपे राजेश पाटील संजय पाटील ग्रामपंचायतचे सदस्य सदस्य प्रतिनिधी ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.शिरोली ग्रामपंचायत ने गौरी गणपती विसर्जनासाठी कृत्रिम कुंड ठेवले होते तसेच सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती विसर्जनासाठी दोन तराफे निर्माल्यासाठी दोन ट्रॅक्टर घंटागाड्या यांची व्यवस्था केली होती तसेच मूर्ती दान करणाऱ्यांची संख्या ही लाक्षणिक होती तब्बल २१७० गणेश मूर्ती दान करण्यात आल्या बिरदेव तलाव या ठिकाणी गणेश भक्तांनी बिरदेव तलावाच्या काठाला ठेवण्यात आलेल्या कुंडांमध्ये बाप्पांची मूर्ती विसर्जित करून ती दान करण्यासाठी शिरोलीकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.