गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कुंभोज नगरीमध्ये लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत

Spread the love

गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कुंभोज नगरीमध्ये लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत

कुंभोज प्रतिनिधी / आकाश शिंदे

हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे जवळपास 40 ते 50 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. सालाबादप्रमाणे यंदाही सर्व मंडळांनी गणरायाच्या आगमनाची जोरदार तयारी केली होती. त्याप्रमाणे गावातील प्रमुख मार्गावरून पारंपारिक वाद्य, डॉल्बी, फुलांची आकर्षक सजावट, तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत गणरायांचा मिरवणूक सोहळा संपन्न झाला. गावातील मुख्य बस स्थानक चौकामध्ये मंडळांच्या मिरवणुका एकत्रित येऊन ठरल्याप्रमाणे आपापल्या मंडळाच्या दिशेने रवाना झाल्या. यावेळी सर्व मिरवणुका अतिशय शांततेत संपन्न झाल्या कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. यासाठी हातकणंगले पोलीस स्टेशनचे बीट अंमलदार रविकांत शिंदे, पोलीस पाटील महंमद पठाण, तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे अनमोल सहकार्य लाभले. यावेळी दिनांक 14 रोजी होणारा सार्वजनिक गणपती विसर्जन सोहळा अशाच पद्धतीने शांततेत व सहकार्याने पार पाडा अशी सूचना बीट अंमलदार रविकांत शिंदे यांच्या वतीने देण्यात आली.

error: Content is protected !!