पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
मानसिक संतुलन बिघडलेल्या पतीने अज्ञात कारणावरून पत्नीच्या डोक्यात हातोडा मारून जखमी केलेल्या पत्नीचे उपचारादर्म्यान आज बुधवारी शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला ही ही घटना सोमवारी रात्री घडली. तर पतीने शासकीय रूग्णालयातून पळ काढला व बावडा मार्गे येऊन पंचगंगा नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे येत आहे तो अध्याप सापडला नसल्याने पोलिसानी त्याचा शोध घेत आहे.याबाबत पोलिसांकडून आणि घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की मयत मनीषा सागर कोळवणकर ( वय ३२) आरोपी पती सागर गोपाळ कोळवणकर ( वय ३५ रा मुळगाव शेळोली भुदरगड सध्या रा शिरोली पुलाची ) हे आपल्या दोन मुलासह शिरोली पुलाची येथील कोरगावकर कॉलनीमध्ये नऊ वर्षापासून एका भाड्याच्या घरात राहत होते सागर व मनीषा दोघेही शिरोली औद्योगिक वसाहतीमधील कंपनीत कामास जावून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते गेले दोन दिवसापूर्वीच मनीषा हिचे आई-वडील आणि भाऊ नाना लक्ष्मण मोहिते हे त्याच्याकडे राहायला आले होते. सोमवारी मध्यरात्री अचानक सागर याने अज्ञात कारणावरून आपल्या पत्नी मनीषाच्या डोक्यात हातोडीचे घाव घातले . अचानक झालेले या हल्ल्यामुळे मनीषाही किंचाळत उठली त्यामुळे घरातील सगळे जागे झाले आणि एकच गोंधळ उडाला त्याची मुले दरवाजा उघडून बाहेर आली शेजारील नागरिकांनी सागर याला पकडून ठेवले आणि शिरोली एमआयडीसी पोलिसांना कळवले पोलिस घटनास्थळी येवून जखमी मनीषाला कोल्हापूर येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले .त्यानंतर घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी सागरला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने बेशुद्ध पडण्याचे नाटक केले त्यामुळे पोलिसांनी त्याला अटक न करता 108 क्रमांकाची रुग्णवाहिकेतून त्यालाही रूग्णालयात पाठवले पण सागर हा पहाटेपर्यंत रूग्णालयात थांबला आणि तेथून तो पळ काढत बावडा मार्गे शिये पंचगंगा नदीच्या पुलावर आला आणि त्याने नदीत उडी मारल्याचे काही लोकांनी पहिल्याचे समजते त्यामुळे सागर याने आत्महत्या केली असावी असाही संशय व्यक्त होत आहे . गेल्या काही महिन्यापासून सागरचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे येथील नागरिक पोलिसाना सांगत होते पण मानसिक तणावात असलेल्या सागरला ताब्यात घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.