शिरोली एमआयडीसी येथील महिंद्रा कुरियर ऑफीसची चोरीचा छडा

कोल्हापूर जिल्ह्यात सातत्याने होत असलेल्या घरफोडीचे गुन्ह्यांच्या अनुसंघाने गुन्हे उघडकीस आणणेच्या दृष्टिने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना घरफोडी रेकॉर्डवरील आरोपी तपासून गुन्हे उघडकीस आणणेबाबत मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या पथका मार्फत घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणणेचा प्रयत्न चालु असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस अंमलदार राम कोळी, शुभम संकपाळ, सागर माने, सोमराज पाटील, पाटील, परशुराम गुजरे यांनी केलेल्या तांत्रीक तपासान्वये शिये येथील महिंद्र कुरियर ऑफीसमध्ये केलेली घरफोडी ही तेथील कामगार पंकज यांनीच केली असल्याची खात्री आज

झाली.त्यामुळे तपास पथकाने तात्काळ पंकज यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पंकज कुंतीलाल कल्याणकर, वय २३ वर्षे, रा. आर. के. नगर पाचगाव, कोल्हापूर असे सांगीतले. त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले.त्यानंतर दोन पंचासमक्ष कायदेशिर प्रक्रीया करून त्याचेकडून रोख रक्कम रूपये ३ लाख ६ हजार रूपये हस्तगत करण्यात आले आहेत.त्याने आणखीन काही गुन्हे केले आहेत काय याबाबत त्याचेकडे तपास सुरू असून त्यास पुढील कायदेशिर कारवाई करिता शिरोली एम.आय.डी.सी.पोलीस ठाणेस हजर केले आहे.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर,राम कोळी, सागर माने, सोमराज पाटील, लखन पाटील, शुभम संकपाळ, परशुराम गुजरे यांनी केली आहे.

Spread the love
error: Content is protected !!