पु शिरोली येथे विविध सुविधा व योजनाचा सन्मान सोहळा

Spread the love

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे

शिरोली ग्रामपंचायतीच्या वतीने शासनाकडून महिला व शेतकरी वर्गांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या विविध योजनेतील लाभार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न झाला.
हा सोहळा माजी जि.प.अध्यक्षा सौ.शौमिका महाडिक यांच्या हस्ते व सरपंच सौ.पद्मजा करपे, उपसरपंच बाजीराव पाटील,कृषी अधिकारी अर्चना कारंडे, व्यवस्थापक कोजागिरी सनगर,सचिन पाटणकर, प्रकाश कौंदाडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी लखपती सन्मान ,महिला सक्षमीकरण कार्यशाळा,कोविड मध्ये घरातील पुरुष गमावलेल्या कुटुंबाला शिलाई मशीन वाटप,मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान,प्रगतशिल शेतकरी बियाणे वाटप, गणराया अँवार्ड अशा अनेक लाभार्थी महिला व पुरुष यांना यावेळी प्रमाणपत्र, वस्तू वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आशा स्वंयसेविका २२, अंगणवाडी सेविका २२, मदतनीस २२ यांचा सन्मान करण्यात आला. तसेच कोविड मध्ये घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या ३६ कुटुंबाला शिलाई मशीन वाटप .१५० प्रगतशील शेतकरी यांना बियाणे वाटप, महिला सक्षमीकरण कार्यशाळेला उपस्थित महिलांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला, लखपती दीदी सन्मान सोहळा, गावामध्ये सन २०२३ मध्ये गणेश उत्सवामध्ये ज्या मंडळांनी सामाजिक देखावा, मिरवणूक समाज प्रबोधनात्मक मिरवणूक अशा मंडळांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले.या कार्यक्रमास ग्रामविकास अधिकारी ए.वाय.कदम,विजय जाधव महंमद महात,आरिफ सर्जेखान, महादेव सुतार, श्रीकांत कांबळे,अविनाश कोळी, कमल कौंदाडे, सुजाता पाटील, मनीषा संकपाळ, धनश्री खवरे , मंगल शिंदे, वसिफा पटेल, नजिया देसाई, हर्षदा यादव,कोमल समुद्रे आदीसह पदाधिकारी, ग्रामस्थ व लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.नियोजन योगेश खवरे, कृष्णात करपे, संपत संकपाळ, दिपक यादव, बाळासो पाटील,बटील देसाई, हिदायत्तुल्ला पटेल आदींनी केले.

error: Content is protected !!