मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील शनिवारी मालवण दौर्यावर होते.सायंकाळी पाचच्या सुमारास शिरोळ येथे राजू शेट्टी यांच्या निवासस्थानाबरोबर आंदोलन अंकुशच्या शेतकरी वजन काट्याला भेट देऊन पाहणी केली. दरम्यान शिरोळ तालुक्यातील राजकीय परिस्थिती माहिती जाणून घेतली.शिवाय लवकरच शिरोळबाबत आपण चर्चा करू, असे आश्वासन मनोज जरांगे पाटील यांनी पदाधिकार्यांना दिली.
मालवण येथे मनोज जरांगे पाटील जात असताना त्यांनी मिरज, शिरोळ, नृसिंहवाडी, निपाणीमार्गे प्रवास केला. यावेळी सायंकाळी 5.30 च्या सुमारास राजू शेट्टी यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी शेट्टी यांच्या पत्नी संगिता शेट्टी व मुलगा सौरभ शेट्टी यांनी त्यांचे स्वागत त्यानंतर शेट्टी यांच्या आई रत्नाबाई यांच्याशी तब्येतीची विचारपूस केली.
त्यानंतर सौरभ शेट्टी यांच्याकडून राज्यातील विद्यार्थी परिषदेच्याबाबत कामाची माहिती घेतली.
त्यानंतर आंदोलन अंकुश या संघटनेने उभारलेल्या शेतकरी वजन काट्याची मनोज जरांगे यांनी पाहणी केली.
यावेळी अंकुशचे धनाजी चुडमुंगे, दिपक पाटील यांच्या पदाधिकार्यांनी आंदोलन अंकुशबाबत माहिती दिली. त्याचबरोबर शिरोळ तालुक्यातील पदाधिकार्यांनी तालुक्यातील राजकीय परिस्थितीची माहिती दिली. यावर आपण लवकरच चर्चा करू असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर नृसिंहवाडी येथील मुख्य कमानीजवळ कार्यकर्त्यांनी स्वागत केले.