शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळचे माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैय्या ग्रुप आणि डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयक्त विद्यमाने शिरोळात शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी छत्रपती शिवाजी चौकातील भाजी मंडई येथे मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. भैय्या ग्रुपच्या वतीने सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी महिलांची विशेष बैठक व्यवस्था, डि.जे, आकर्षक आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. हा नेत्रदिपक सोहळा पाहण्यासाठी 5 ते 6 हजार नागरीकांनी उपस्थिती लावली होती. कोणतीही गौरसोय होवू नये याची पुरेपुर दक्षता भैया ग्रुपच्या वतीने घेण्यात आली होती.
यावेळी जय महाराष्ट्र, जय हनुमान तालीम मंडळ,गोडी विहीर तालीम मंडळ (अध्यक्ष प्रेमी),गोडी विहीर तालीम मंडळ (एस.पी.बॉयज),विजयसिंह नगर, जय भवानी मंडळ शिरोळ,बुवाफन मंडळ, आदी गोविंद पथकांनी सहभाग नोफ्लदवला होता. यावेळी जय महाराष्ट्र गोविंद पथकाने 32 फुट उंचीवरील दहीहंडी 6 थर रचत फोडली. यावेळी विजेत्या संघासह नागरीकांनी एकच जल्लोष केला.विजेत्या सघास 55555 रूपये सन्मान चिन्ह, पारितोषक देवून मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.तर 5 थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास प्रत्येकी 5 हजार रुपये देण्यात आले.यावेळी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर,श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील, संजय पाटील यड्रावकर, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते. सोहळा यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर माने चुडमुंगे, युवा नेत्ो धैर्यशील पाटील, किरण माने गावडे, चिंटू पाटील, अमित उर्फ बंटी संकपाळ,संदिप चुडमुंगे,चंद्रकांत गावडे सर,उमेश जगदाळे, ज्ञानेश्वर पाटील, उमेश जगदाळे, हरीष माने, प्रथमेश कुंभार, तुषार उर्फ अदीक काळे, सागर काळे,पृथ्वीराज पाटील, मालोजी निंबाळकर यांच्यासह भैय्या ग्रुपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कष्ट घेतले.