शिरोळ पालिका कर्मचारी संपावर, पालिकेवर ठिय्या
जुनी पेन्शन योजन लागू करण्याची मागणी
शिरोळ / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य शासनाचे अधिकारी/कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय विविध संघटनामार्फत जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी गुरूवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे नगरपरिषद, नगरपंचायतीमधील सन 2005 नंतरच्या अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. तसेच, जुनी पेंशन योजना बंद करण्यात आलेली असल्याने शिरोळ नगरपालिकेच्या कर्मचार्यांनी बेमुदत संपात सहभाग घेतला असल्याने शिरोळ पालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.या कर्मचार्यांची मागणी अशी की, आस्थापनेवील 60 हजारावर कर्मचारी वर्ग यांचेत कमालीचा नाराजी आहे. जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी संघटना व सदस्य आग्रही आहे. तसेच, संघटनेमार्फत संदर्भीय निवेदन शासनास, नगरविकास विभागास व नगरपरिषद प्रशासन संचालनालयास वेळोवेळी सादर करण्यात आलेली आहेत. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने संप पुकारण्यात आला आहे. यामुळे तात्काळ कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली यावेळी कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला दरम्यान पालिकेचे मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनीही या आंदोलनाला अधिकारी वर्गांचा पाठींबा असल्याचे सांगितले. यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता व राज्य संवर्ग अधिकारी कर्मचारी संघटनेचे शिरोळ नगरपरिषद अध्यक्ष अमन मोमीन, प्रशासन अधिकारी लक्ष्मण लोंढे, उपाध्यक्ष तथा करनिरिक्षक चंद्रकांत पाटील, विजयकुमार मुळीक, अश्विनी पाटील, लेखा परिक्षक हरीपांडू कामून, प्रमोद खोंद्रे, श्रीधर डुबले, शिरोळ नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदिप चुडमुंगे, लिपिक सचिन सावंत, मल्लिकार्जुन बल्लारी, साहील मकानदार, अमोल बन्ने, पोपट आदके प्रभावती बाबर स्नेहल कोळी यांच्यासह सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.