शिरोळमध्ये भैय्या ग्रुपच्या वतीने शुक्रवारी भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन

Spread the love

दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास 55500 रुपयाचे पारितोषिक

शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळचे माजी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष अमरसिंह पाटील भैय्या ग्रुप आणि डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिरोळात शुक्रवार दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता शिवाजी चौकातील भाजीमंडई येथे मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास 55500 रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे अशी माहिती भैय्या ग्रुपचे अमित उर्फ बंटी संकपाळ, चंद्रशेखर माने चुडमुंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भैय्या ग्रुपच्यावतीने गेल्या अनेक वर्षापासून दहीहंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते, यावर्षीही शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता भाजीमंडई येथे दहीहंडी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी महिलांची विशेष बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.आकर्षक आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे.दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकास 55500 रुपयाचे बक्षीस दिले जाणार आहे.5 थराची सलामी देणाऱ्या गोविंदा पथकास प्रत्येकी 5 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे अशी माहिती अमित उर्फ बंटी संकपाळ व चंद्रशेखर माने चुडमुंगे यांनी दिली.या दहीहंडी सोहळ्यासाठी खासदार धैर्यशील माने, आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील, श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यानपंडित गणपतराव पाटील, गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.हा दहीहंडी सोहळा पाहण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भैया  ग्रुपचे सुरज कांबळे यांनी केले.स्वागत भैय्या ग्रुपचे प्रमुख चंद्रशेखर माने -चुडमुंगे यांनी केले. यावेळी युवा नेते धैर्यशील पाटील,किरण माने गावडे, चिंटू पाटील, ज्ञानेश्वर पाटील, उमेश जगदाळे, हरीष माने, दिग्विजय माने, प्रथमेश कुंभार, तुषार उर्फ अदीक काळे, पृथ्वीराज पाटील, मालोजी निंबाळकर यांच्यासह भैय्या ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!