पुलाची शिरोली / कुबेर हंकारे
शिये ता.करवीर येथे दहा वर्षाच्या मुलीवर पाशवी अत्याचार अमानुष मारहाण करून खुन करण्यात आला.या प्रकरणातील आरोपीला जास्तीत जास्त लवकर आणि कठोरातील कठोर शिक्षा व्हावी.यासाठी प्रयत्न करणार असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी शिरोली पोलीस ठाण्यातील पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी सुनिल फुलारी म्हणाले तसेच शिरोली एमआयडीसी भागात रोजगार उपलब्ध असल्याने परप्रांतीय लोक या परिसरात आले आहेत.त्यामुळे शिरोली,नागाव,शिये,टोप परीसरातील ते भाड्याने खोल्या घेऊन रहात आहेत.अशा परप्रांतीयांचे संबंधित गावातील सरपंच,ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांनी जबाबदारी घेऊन त्यांचे दाखले घेत पुरावे गोळा केले पाहिजेत.त्यांची पार्श्वभूमी तपासणी केली पाहिजे.
या प्रकरणी एक विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे.हे पथक आवश्यक ती सर्व माहिती घेऊन त्याप्रमाणे कागदपत्रे तयार करतील आणि जलद गती न्यायालयात सादर करतील.जेणेकरून आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न केले जातील.तसेच घडलेल्या घटनेचे गांभीर्य मोठे आहे.
याची सखोल चौकशी आणि नराधम दिनेश कुमार केशनाथ साह याच्या विरोधात भक्कम पुराव्यानिशी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यासाठी करवीरचे पोलिस उपअधीक्षक सुजित क्षिरसागर यांच्या नेतृत्वाखाली एसआयपी पथक तयार करण्यात आले आहे.या पथकामध्ये दोन महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक, एक महिला पोलिस उपनिरीक्षक,स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग,शिरोली एमआयडीसी पोलिस यांचा समावेश करण्यात आला आहे.