शिरोळ / प्रतिनिधी
आपण सर्वांनी सर्वप्रथम स्वता:वरती प्रेम करायला शिकल पाहिजे. तरच आपल्याला आपल्याकडे असलेल्या चांगल्या गुणांची माहीती होईल,आपण आपल्या जिवनामध्ये सकारात्मक बदल घडतील असे मनोगत मनिषा बेहनजी यांनी केले.
शिरोळ येथील ब्रम्हाकुमारी विश्वविद्यालयात स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संग्राम पाटील होते.यावेळी कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक अर्चना बेहनजी यांनी केले.
सॅटरडे ग्लोबल ट्रस्टच्यावतीने उद्योगरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल संग्राम पाटील यांचा संत्कार करण्यात आला.तसेच तसेच रोटरी क्लब ऑफ शिरोळचे नुतन अध्यक्ष रोटे सुनिल बागडी,सेक्रेटरी रोटे अंगराज माने, ट्रझरर रोटे दिनेश गावडे,रोटरी क्लब ऑफ हेरीटेज सिटीचे नुतन अध्यक्ष रोटे तुकाराम पाटील,
सेक्रेटरी काशीनाथ भोसले,ट्रेझरर चंद्रकांत भाट,रोटरी क्लब ट्रेड सिटी जयसिंगपूर येथील नुतन पदाधिकारी रोटे राकेश पारेख,रोटे डॉ.अतिक पटेल,रोटरी क्लब जयसिंगपूरचे नुतन अध्यक्ष रोटे अरूणा पाटील,सेक्रेटरी रोटे सुमित पाटील,रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटीचे नुतन अध्याक्ष अविनाश पट्टणकुडे,सेक्रेटरी रोटे नरेंद्र पाटील,
रोटरी कलब कुरुंदवाड येथील अध्यक्ष रोटे जावेद सनदी, सेक्रेटरी शिवाजी बाबर,रोटरी क्लब कुरुंदवाड रिव्हर साईड येथील अध्यन रोटे विलास गुरव,सेक्रेटरी रोटे ओमप्रकाश सातपुत्ो, असोशिएशन ऑफ इंजिनिअर्स ॲण्ड अर्किटेक्टस शिरोळचे अध्यक्ष नितीन शेट्टी, उपाध्यक्ष मा. सुजित पाटील,सेक्रटरी स्वप्नील ढेरे,
भरत अर्बन बँक तर्फे डॉ.जे.जे.मगदूम समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मोहन माने सर व राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.स्वाती माने यांचा सत्कार करण्यात आला याबरोबरच लायन्स क्लब ऑफ शिरोळचे नुतन पदाधिकारी अध्यक्ष बुधाची चुडमुंगे,सेक्रेटरी अमोल देशमुख,ट्रेझरर अभिजीत गुरव,
जायंटस ग्रुफ फेडरेशनच्या ऑफीसर हेमलता जाधव, हरोली गावचे मा. अभिजित कदम,थायलंड मध्ये झालेल्या 100मी. स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल मिळाल्याबद्दल निवेदिता अमरसिंह शिंदे,राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रज्ञा माळकर,शिवम माळकर आदींचा सत्कार करण्यात आला.
शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील,पृथ्वीराज यादव,डॉ.दगडू माने यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.सुत्र संचालन ऋतुजा शेट्टी यांनी केले तर आभार नितीन शेट्टी यांनी मानले.