पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
मुलाच्या लग्नासाठी 21 वर्षे पुर्ण असलेल्या अटीप्रमाणे मुलीचेही वय लग्नासाठी 21 वर्षे करावे जेणेकरून स्त्री-पुरुष समानता येईल व मुलगी विचाराने व शैक्षणिक पात्रतेने प्रगल्भ होईल व तिला तिच्या आयुष्यात योग्य निर्णय घेता येईल या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना माजी पंचायत समिती सदस्य कृष्णात पोवार यानी दिले.
मुलगा व मुलगी प्रेम विवाह ( लव्ह मॅरेज ) करत असताना आई – वडिलांची संमती असणे बंधनकारक करण्यात यावे व मुलाच्या विवाहाचे वय 21 आहे त्याप्रमाणे मुलीचेही वय 21 वर्षे करावे सध्या प्रेम विवाह करीत असताना मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत प्रेमविवाह करतात. त्यामुळे लँड जिहाद, लव्ह जिहाद, वोट जिहाद, टार्गेट किलिंग यासारखे मनसुबे समोर ठेवून हे सर्व प्रकार सुरू आहेत.
कायद्याने 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर सज्ञान असल्यामुळे मुलांचे पालक किंवा आई-वडील हतबल होतात. पण त्याचे दुष्परिणाम अत्यंत भयानक स्वरूपाचे असून मुलगी/मुलगा सुज्ञान असल्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात मुलींना एकुलती एक पाहून प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते व लग्न केल्यानंतर एक तर त्या मुलीचा मानसिक किंवा शारीरिक छळ केला जातो.
कारण मुलीने प्रेमविवाह केला असल्याने पालकांचा त्यांच्याशी संपर्क बंद झालेला असतो. त्यामुळे काही वेळा अशा मुलीना एकतर आत्महत्या, देहविक्री, धर्म परिवर्तन, वाम मार्गास लागून अत्यंत वेदनादायी प्रकारास सामोरे जावे लागते किंवा सोडचिठ्ठी घेऊन एकांताचे जीवन जगतात.
मुलीच्या पालकांनी आई-वडिलांनी आपल्या मुलीला / मुलग्याला चांगले शिक्षण देऊन संगोपन करून, आयुष्यात ती सुखी राहावीत, या उद्देशाने जमविलेली आपली सर्व पुंजी व प्रसंगी कर्ज, शेतीभाती,घर विकून खर्च केला जातो हा सर्व प्रकार थांबायचे असल्यास गुजरात व उत्तर प्रदेश या राज्यांनी ज्या प्रकारे लव्ह मॅरेजसाठी पालक किंवा आई-वडिलांची संमती आवश्यक असल्याचा कायदा केला आहे.
त्याप्रकारे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील गृहविभागाकडून प्रेम विवाह (लव्ह मॅरेज ) प्रकरणाची माहिती अहवाल घेऊन हा कायदा करावा. तसेच मुलाचे लग्नासाठी 21 वर्षे आहे, त्याचप्रमाणे मुलीचेही वय लग्नासाठी 21 वर्षे करावे, जेणेकरून स्त्री-पुरुष समानता येईल व मुलगी विचाराने व शैक्षणिक पात्रतेने प्रगल्भ होईल व तिला तिच्या आयुष्यात योग्य निर्णय घेता येईल.
तसेच 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जे काही नुकसान होत आहे, या गंभीर परिस्थितीतून ती बाहेर पडेल व होणारा दुराचार व दुष्पपरिणामांना आळा बसेल.यावेळी तानाजी चौगुले,सरदार खाडे,शिवाजी साळोखे,बाबासो पाटील, गीता चौगले,शारदा पोवार,राणी पाटील,पांडुरंग पाटील, अमर उरूणकर,शिवाजी पाटील,भानुदास पाटील आदि उपस्थित होते.