बेफिकीरपणे टेम्पो गाडी चालवून मोटरसायकल स्वाराला दिली धडक

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

शुक्रवार दिनांक 14 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास टोप कडून मादळे कडे जाणाऱ्या रोडवर भरधाव टेम्पो (टेम्पो क्रं.एम एच ०९ एफ एल ०३२७) ने मोपेडला (एम एच ०९ जी क्यू ७२३१) धडक दिल्याने मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला.सविस्तर माहिती अशी की , मनीष लालवन वर्मा वय वर्ष 19 सध्या रा.कासारवाडी ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर मूळ गाव मोहरवा, ता.सिमरिया,जि.रीवा मध्य प्रदेश या टेम्पो चालकाने भरधाव वेगाने,बेफिकीरपणे गाडी चालवून समोरुन येणाऱ्या मोटरसायकल स्वाराला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की मोपेड स्वार रणजीत अशोक पाटील वय वर्ष 28 रा.मनपाडळे,ता. हातकणंगले जि. कोल्हापूर हे गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या घटनेची नोंद शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली असून सदर टेम्पो चालकाविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे.

error: Content is protected !!