“ब्रेकिंग” प्रेम प्रकरणातून तरुणांचा निर्घृण खून

Spread the love
पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 
प्रेम प्रकरणातून तरूणीच्या नातेवाईकांनी धारधार शस्त्राने सपासप वार करून तरूणाचा निर्घृण खून केला.हि घटना शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमार पुणे बंगलूर राष्ट्रीय महामार्गाच्या शेजारी पुलाची शिरोलीतील ( सांगली फाटा) बुधले मंगल कार्यालय येथे उघडकीस आली.खुन झालेला तरूण हा पाडळी ता. हातकणंगले येथील होता.तो सैन्य दलात (आर्मीत) भरती होण्यासाठी प्रयत्न करत होता. त्या अधिच जीवनातूनचं संपला आणि त्याचे आर्मीचे स्वप्न अपुरेच राहून गेले. घटनास्थळावरून व पोलिसांनी मिळालेली माहिती अशी, मयत तरूणाचे नाव संकेत संदीप खामकर ( वय वर्ष १९ रा.पाडळी ता.  हातकणंगले ) असे असून त्याचे पेठवडगाव येथील एका मुलीशी प्रेमसंबध होते. त्या मुलीच्या नातेवाईकांचा पुलाची शिरोलीतील  बुधले मंगल कार्यालयात बारश्याचा कार्यक्रम होता.संकेत हा मुलीला भेटण्यासाठी गावातील एका मित्राला सोबत घेवून बुधले मंगल कार्यालयात आला असल्याचे मुलीच्या नातेवाईकांना समजल्यावर संकेत व नातेवाईक यांच्यात वाद झाला.या वादातून नातेवाईकांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यास ठार मारले.ही घटना शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली होती.या तरुणावर हल्ला होत होता.त्यावेळी त्यांना रोखण्यासाठी कोणीच पुढे आले नाही.त्याच्या सोबत आलेल्या मित्रास ही मुलीच्या नातेवाईकांनी ठार मारण्याची धमकी दिली व त्याचा मोबाईल ही काढून घेतला.घाबरलेल्या अवस्थेत संकेतच्या मित्राने तेथून पळ काढला.त्याने शिरोली फाटा येथे येवून अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवरून गावात फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली.संकेतला वेळेवर उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले असते तर त्याचा जीव वाचला असता.संकेत पाच वर्षांचा होता त्यावेळी त्याच्या वडीलांचे निधन झाले आहे. त्यानंतर संकेतची आई ही संकेतला सोडून तीच्या माहेरी निघून गेली आहे.त्यानंतर आज पर्यंत संकेतचा सांभाळ त्याच्या आजी व चुलत्यानी केला होता.संकेतच्या खुनाच्या बातमीने पाडळी गावात खळबळ उडाली आहे. शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.यातील आरोपी हा एका प्रकरणात सजा भोगत आहे.तो नुकताच पॅरोलवर बाहेर आला असे समजते.सपोनि पंकज गिरी तपास करीत आहेत.त्याच्या पश्चात वयस्कर आजी आजोबा व लहान बहिन असा परिवार आहे.
error: Content is protected !!