मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रेंदाळ येथे बुद्धिबळ स्पर्धा

Spread the love

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त रेंदाळ येथे बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

इचलकरंजी / प्रतिनिधी

विविध स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंच्या मनात एकाग्रता आणि आत्मविश्वास निर्माण होत असतो बुद्धिबळसारख्या स्पर्धेमुळे बौद्धिक क्षमता वाढत असते यामुळे अशा स्पर्धा वारंवार होणे गरजेचे आहे असे मत डॉ अरविंद माने यांनी रेंदाळ येथे व्यक्त केले.

 

महाराष्ट्र राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी डॉ अरविंद माने हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.राजवर्धन नाईक निंबाळकर हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

नगरसेवक डॉ अरविंद माने बोलताना पुढे म्हणाले की भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरिता नमो चषक क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच खेळाडूंना या स्पर्धेचा लाभ मिळाला

 

 

त्यामुळे खेळाडूंचीही प्रगती साधता आली याचा आम्हाला अभिमान आहे.यापुढेही असल्या स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कोल्हापूर जिल्हा भाजपा अध्यक्ष राजवर्धन निंबाळकर बोलताना म्हणाले की मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूर जिल्हाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

 

गोरगरीब जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला नैसर्गिक व अपत्यकालीन संकटात जनतेच्या सुरक्षेचेबरोबरच त्यांच्या मदतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.

 

 

यामुळेच विकास पुरुष म्हणून त्यांना ओळखले जाते त्यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्यावतीने येथे बुद्धिबळ स्पर्धा होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना चांगली दिशा मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

कोल्हापूर जिल्हा भाजपा चिटणीस सचिन मेथे, हातकणंगले तालुका भाजपा सरचिटणीस नितीन पाटील, कोल्हापूर जिल्हा कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष उमेश तांबे, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष सौ पार्वती निकम,माजी ग्रामपंचायत सदस्या सौ पुष्पांजली देव,

 

 

अशोक महाजन,सयाजी पाटील, रेंदाळ शहर शिवसेना प्रमुख शरद पाटील,संदीप पुजारी,काशलिंग पुजारी, संदीप मोहिते,प्रशांत मिठारी,अक्षय पाटील,प्रवीण कोळी, संतोष घोडेस्वार,संग्राम पाटील,सचिन कुंभार

 

 

यांच्यासह सर्वच भाजपा पदाधिकारी व युवा मोर्चा पदाधिकारी आणि खेळाडू ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!