कृषी पंपांच्या पाणीपट्टी दरवाढी विरोधात पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन

पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 
पाणी आमच्या हक्काच आहे.कोणाच्या बापाचं नाही, त्यामुळं कृषी पंपाची पाणी पट्टी दरवाढ जो पर्यंत मागे घेतली जात नाही, तो पर्यंत विविध मार्गाने आंदोलनं सुरु ठेवण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनने दिला आहे. कृषी पंपांच्या पाणीपट्टी दरवाढी विरोधात आज पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा नदी पुलाजवळ इरिगेशन फेडरेशनच्या वतीन आंदोलन करण्यात आलं.
यावेळी हा इशारा देण्यात आला.आमदार सतेज पाटील हे देखील, या आंदोलनात सहभागी झाले होते.पाणी मीटर तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट,कोणत्या तरी व्यापाऱ्याला मिळावं यासाठी हे सर्व सुरु आहे. असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.
कृषी पंपांच्या शासकीय पाणीपट्टीमध्ये भरमसाठ वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याच धोरण देखील सरकारने अवलंबले आहे.याच्या निषेधार्थ,महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या वतीन,पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगा पुलानजीक धरणे आंदोलन करण्यात आलं.
इरिगेशन फेडरेशनने पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा दिला होता.मात्र मागण्याबाबत सहा जून रोजी मंत्रालयात बैठक घेण्याचं आश्वासन पाटबंधारे विभागाने दिल्यानंतर या ठिकाणचे महामार्ग रोको आंदोलन स्थगित करून सर्विस रोडच्या ठिकाणी धरणे आंदोलन करत सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी शेतकरी हिताची आमची भूमीका असल्याचं त्यांनी सांगितलं. अनेकांनी सहकारातून पदर मोड करुन पाणी पुरवठा संस्था उभ्या केल्या आहेत.सरकारला आंदोलनाची ताकत लक्षात आल्यानेच, पाटबंधारे विभागाचे अधिकारी याठिकाणी बैठकीच पत्र घेवून आले आहेत.मात्र आता सरकारलाही शेतकऱ्याच्या ताकतीची जाणीव झाली
असल्याचं त्यांनी सांगितलं ६ जून रोजी सरकारनं मंत्रालयात बैठक घेण्याच आश्वासन दिलं आहे.मात्र सरकारने पुन्हा आचासंहितेच कारण देवू नये.कोणत्याही परिस्थीतीत पाणी पट्टी दरवाढीचा हा निर्णय रद्द झाला पाहिजे.६ तारखेला निर्णय न झाल्यास कोल्हापूर कर आंदोलनात कमी पडणार नाहीत असा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला.
शिवाय कृषी पंपांना पाणी मीटर बसवण्याचे राज्य सरकारचे धोरण म्हणजे,पाणी मीटर तयार करण्याचे कॉन्ट्रॅक्ट,कोणत्या तरी व्यापाऱ्याला मिळावं. यासाठीच हे सर्व सुरु आहे.असा घनाघाती आरोपही आमदार सतेज पाटील यांनी केला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी फक्त शेतकऱ्यांवरच ही दरवाढ का लादण्यात आली आहे.व्यापाऱ्यांना दर वाढ केली काय? असा सवाल करत या सरकारवर माझा विश्र्वास नसल्याच त्यांनी सांगितल.काही तरी कागद द्यायचा आणि फसवणूक करायची.हे चालणारं नाही.
यापुढे राष्ट्रीय महामार्ग जाम केल्याशिवाय राहणार नाही.पाणीपट्टीची दरवाढ आणि पाणी मीटर बसविन्याचा निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह, उपमुख्यमत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशाराही यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.
आमदार अरूण लाड यांनी कृषी पंपांच्या पाणीपट्टीत अचानक दर वाढ केली असून, शेतकऱ्याला त्याची कोणतीही कल्पना दिली नसल्याचं सांगितल.शेतकऱ्यावर हा दरवाढीचा अन्याय चालतोय ही त्यांची भावना झाली आहे.हे सरकार बिनडोक असल्याची टीकाही आमदार लाड यांनी यावेळी केली.
डॉ.भारत पाटणकर यांनी कृषी पंपांची कोणतीही दर वाढीनुसार आम्ही पाणी बीले भरणार नसल्याचं त्यांनी सांगितलं.कोणतीही थकबाकी लादल्यास भरणार नाही.६ जुनच्या बैठकीत फसवी झाली तर या सरकारला येत्या विधान सभा निवडणुकीत घरी बसवल्याशिवाय राहणार नाही.असा इशारा त्यांनी दिला.
माजी आमदार संजय घाटगे यांनी जे शेतकरी आंदोलनासाठी आलेत ते स्वयं स्फुर्तीने स्वतःचे पैसे खर्च करून आले आहेत.रस्त्यावर उतरून विरोध केल्याशिवाय पर्याय आता पर्याय नाही. काम धंदे सोडून आंदोलन करणे आमचा पेशा नाही.सरकारला निवेदन दिलेत मात्र आमची दखल घेतली नाही.
आता ६ तारखेला मंत्रालयात बैठक बोलावली आहे.आमच्या मागण्या मान्य होई पर्यंत आपणं वाट पाहूया.आम्हाला पाणी पट्टी दर वाढ कमी करुन घ्यायची आहे. त्याशिवाय आम्हीं थांबनार नाही.असा इशाराही माजी आमदार घाटगे यांनी दिला.
राजाराम कारखान्याचे चेअरमन प्रतीक जयंत पाटील म्हणाले 10 पट्टीने महागाई वाढली आहे. मात्र शेती मालाचे दर आहे तेच आहे.त्यातच कृषी पंपांच्या पाणीपट्टीमधील दरवाढ अन्यायकारक असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष
विक्रांत पाटील किणीकर यांनी राज्य सरकारने आमच्यावर अन्याय केल्याने आम्हाला रस्त्यावर उतरावं लागतं आहे.आंदोलन करणे आमचा धंदा नाही. आंदोलनामुळे मुंबई तील खुर्च्या आता हलल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
या आंदोलनात बाजार समितीचे सभापती भारत पाटील भूयेकर,पुलाची शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे,करवीरचे माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, आर.जी.तांबे,बाबासाहेब देवकर,जे.पी.लाड, एस.एम.क्षीरसागर,देवराज पाटील,चंद्रकांत पाटील-पाडळीकर,सुभाष शहापुरे,आर.के.पाटील,सखाराम पाटील,सखाराम चव्हाण,दत्तात्रय उगले,रणजीत जाधव, एस.ए. कुलकर्णी,संजय चौगुले,सचिन जमदाडे, मारुती पाटील यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.
Spread the love
error: Content is protected !!