ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संचालिका सौ.स्वाती मोहन माने राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कारानी सन्मानित
रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलीयंट इंग्लिश मिडीयम स्कुल शिरोळच्या संचालिका सौ.स्वाती मोहन माने यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये निस्वार्थी भावनेने उल्लेखनीय व अतुलनीय कार्य केल्याबद्दल नॅशनल सरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन बेळगावी यांच्या राष्ट्रीय निवड समितीने त्यांच्या या वैशिष्ठ्यपूर्ण व गुणवत्तेच्या सन्मानार्थ महाराष्ट्र राज्यातून निवड केली व गोवा येथे राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये “राष्ट्रीय आदर्श शैक्षणिक सेवा पुरस्कार” खा.अमरसिंह पाटील यांच्या हस्ते प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात आले.
गेली १९ वर्ष सौ.स्वाती माने यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील विकासासाठी स्वतःला समर्पीत केले असून त्यांचे पती संस्थेचे अध्यक्ष मोहन माने सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते उत्कृष्ठ काम करीत आहेत.शैक्षणिक विकास हाच त्यांचा मुख्य ध्यास असून विद्यार्थांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने त्या सदैव प्रयत्नशील असतात.विद्यार्थी,पालक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर यांच्या बरोबर सुसंवाद साधत शाळा व संस्थेचा विकास साधण्याचे काम ते उत्कृष्ठपने करीत असतात.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराने संस्था व समाजातील घटकांना निश्चीत प्रेरणा व प्रोत्साहन मिळणार आहे. समाजातील सर्व स्तरातून त्यांना शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.पुढील काळात सौ.स्वाती माने यांच्या हातून शैक्षणिक व सामाजिक विकासाचे कार्य उत्तरोतर घडत राहावे अशा शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष मोहन माने यांनी दिल्या.तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी त्यांना या गौरवाबद्दल शुभेच्छा दिल्या.