पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
हातकणंगले इथल्या सांगली कोल्हापूर रस्त्यावर लाईफ लाईन हॉस्पिटलच्या पुढील बाजुस झालेल्या अपघातात माणगांव इथले सदाशिव व्यकंप्पा वडर वय 52 हे जागीच ठार झाले तर सदाशिव परशाराम कोरवी वय 48 हे गंभीर जखमी असुन त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा अपघात शनिवार रात्री साडेदहाच्या दरम्यान घडला.
हातकणंगले तालुक्यातील माणगांव इथले मयत सदाशीव वडर आणि सदाशीव कोरवी हे विहीर खुदाईचे काम होते. नेहमीप्रमाणे ते आज हातकणंगले इथले आपले काम आटोपून शनिवार दिनांक 18 रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान दूचाकी क्रमांक एम एच ०९ बिटी ९१०६ वरून माणगांव कडे परतत होते. सदाशिव कोरवी मोटरसायकल चालवत होते तर सदाशिव वडर हे पाठीमागे बसले होते. ते हातकणंगले इथल्या लाईफ लाईन हॉस्पीटल च्या समोरील बाजुस आले असता मोटर सायकलला पाठीमागुन अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने , गाडी रस्ता दूभाजकावर जोरात आदळली यात गाडीवर मागे बसलेले सदाशीव वडर हे रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला फेकले गेले त्याचवेळी कोल्हापूर हून सांगलीच्या दिशेने निघालेले अज्ञात वाहन अंगावरून गेल्याने वडर यांचा जागीच मृत्यु झाला. तर जखमी कोरवी यांना समर्थ रूग्ण वाहीकेतून स्वप्नील नरूटे यांनी उपचारासाठी खाजगी दवाखान्यात दाखल केले. अधिक तपास हातकणंगले पोलिस करत आहेत .