सत्यजित पाटलांचा विजय निश्चित शिरोळच्या प्रचार सभेत व्यक्त केला विश्वास
शिरोळ : प्रतिनिधी
शेतकरी विरोधी धोरण राबवून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करण्याची भूमिका घेत अशी एकही वस्तू नाही की मोदी सरकारने त्यावर कर आकारलेला नाही यामुळे सर्वसामान्यांची पिळवणूक करणाऱ्या या सरकारने पाच वर्षात केवळ पक्ष फोडून सत्ता हस्तगत करणारा कार्यक्रम राबवणाऱ्या भाजपचा जनताच करेक्ट कार्यक्रम करेल यामुळे राज्यात परिवर्तनाची लाट असून महाविकास आघाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून सत्यजित पाटील सरूडकर यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील भाजी मंडई येथे प्रचार सभा झाली या सभेत आमदार जयंत पाटील हे बोलत होते नुसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे हे या सभेचे अध्यक्षस्थानी होते स्वागत दत्त कारखान्याचे संचालक दरगू गावडे यांनी केले
या सभेत बोलताना आमदार जयंत पाटील पुढे म्हणाले की भाजप सरकारने कांदा निर्यात बंदी इथेनॉल उत्पादन बंदी साखर निर्यात बंदी तसेच शेतकऱ्यांनी पिकवलेल्या जास्त उत्पादनावर निर्यात बंदी घालून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा सातत्याने प्रयत्न केला देशात नेहमीच असमानता निर्माण करणारे धोरण मोदी सरकारने राबवली यामुळे या सरकारच्या विरोधात जनतेत असंतोष निर्माण झाला आहे ऊसाची एफ आर फी वाढवण्याची वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात मात्र शरद पवार कृषिमंत्री असतानाच एफ आर फी बाबत कायदा करण्यात आला होता त्यानुसार एफ आर फी वाढत आहे आपल्याला जी जी वस्तू घ्यावी लागते त्या त्या वस्तूवर कर लावून सर्वसामान्यांचे खिसे रिकामे केले शेतकऱ्यांच्या अवजारावर खतावर कर लावून त्यांची आर्थिक पिळवणूक या सरकारने केली आहे तसेच चीनने आपल्या देशातील चार हजार किलोमीटर पर्यंतचा परिसर ताब्यात घेतला आहे तेथील खेड्यांची नावे बदलत आहेत याकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केले आहे देशाच्या सुरक्षेचे प्रश्न गंभीर बनला आहे मणिपूर येथे स्त्रियांच्या अत्याचार होत आहेत यावर मोदी एक शब्द बोलत नाहीत विविध उद्योगपतींची कर्ज माफ करून देशाला कर्जाच्या खाईत लोटले आहे अशा सरकारला हद्दपार करण्यासाठी जनता एकवटली आहे
खासदार धैर्यशील माने किती वेळा या मतदारसंघात आले याचे उत्तर आपणाला शोधावे लागणार आहे ज्यावेळी निधी मिळाला त्यावेळेस फक्त ते उद्घाटनासाठी आले मात्र जनतेची कामे तसेच रखडली राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्यावेळी अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांना पाठिंबा दिला निवडून आल्यानंतर चार दिवसातच त्या मोदी सरकार सामील झाल्या यामुळेच महाविकास आघाडीने आघाडीत येणाऱ्या उमेदवारांना संधी दिली पुन्हा तोच प्रकार घडू नये यासाठी सत्यजित पाटील सरूडकर यांना मैदानात उतरवले आहे भाजप विरोधी असंतोषाची लाट असल्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेची साथ मिळणार असून सत्यजित पाटील सरूडकर यांचा विजय निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले
उद्धव ठाकरे शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले बोलताना म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा या जोडगोळीने शेतकरी सर्वसामान्य जनता यांच्या हिताविरोधी निर्णय घेत त्यांचे आर्थिक कंबरडे मोडण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे धनदाडग्याची कर्जमाफ करून जनतेच्या डोक्यावर कर्ज ठेवले आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात बदल करून आपले अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न या भाजपा सरकारने सुरू ठेवला आहे वाढती महागाई यामुळे जगणे मुश्किल झाले आहे सत्तेसाठी विविध पक्षातील नेते मंडळींना तुरुंगात टाकण्याचा डाव साधून आणि पक्ष फोडून राजकारण करणाऱ्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या मोदी सरकारला हद्दपार करण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हातकलंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांच्या मशाल या चिन्ह समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले
श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सहकारमहर्षी गणपतराव पाटील बोलताना म्हणाले की देशात लोकशाही टिकवण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणे आवश्यक आहे शेतकरी आणि सर्वसामान्य हिताचे निर्णय होण्यासाठी जनतेने पाठबळ देण्याची गरज आहे यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले
माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे लोकशाही धोक्यात आली आहे घटनेमुळेच माझ्यासारखा कार्यकर्ता विधानसभेत पोहोचला सर्वसामान्यांच्या हक्काची असणारी घटना बदलण्याचा घाट या मोदी सरकारचा आहे लोकशाही वाचवण्यासाठी जनतेने लढाईसाठी तयार रहावे सर्वसामान्य जनता व शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सत्यजित पाटील सरूडकर यांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे शिवसेना महिला आघाडीच्या संघटीका मंगलताई चव्हाण कोल्हापूर जिल्हा काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष रणजीतसिंह पाटील मुस्लिम ओबीसी संघटनेचे एम एस गवंडी शेतकरी चळवळीचे नेते यशवंत उर्फ बंटी देसाई ठाकरे शिवसेना प्रवक्ते रणजितसिंह बागल दलित पॅंथरचे जिल्हाध्यक्ष रमेश शिंदे शिवसेनेचे वसीम देशमुख यांनी मनोगत व्यक्त करून सत्यजित पाटील सरुडकरांना विजयी करण्याचे आवाहन केले
या सभेस शिवसेना संघटक चंगेजखान पठाण ,शिरोळ तालुका कॉग्रेस कमिटी अध्यक्ष सर्जेराव शिंदे , ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे , उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील , दत्त साखर कारखाना संचालक शेखर पाटील , गजानन पाटील (जनतादल ) , माजी नगरसेवक पराग पाटील , माजी उपनगराध्यक्ष योगेश पुजारी
तातोबा पाटील , राष्ट्रवादी कॉग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बी जी माने , तालुका अध्यक्ष विक्रमसिंह उर्फ बंटी जगदाळे ,जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामदास गावडे, दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर दरगोबा दुध संस्थेचे चेअरमन आप्पासो गावडे , अनंत धनवडे , वाल्मीकी जरगे , बबलू पवार , अरविंद धरणगुत्तीकर , उपजिल्हाप्रमुख वैशाली जुगळे , साजिदा घोरी , रेखाताई पाटील , शक्तीजीत गुरव अवधूत उर्फ बाबाजी पाटील शंकर कांबळे संजय अनुसे बाळासाहेब कोळी रावसाहेब माने अमोल हिरेमठ सतीश चव्हाण अभिजीत मोरे यांच्यासह महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नेतेमंडळी विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते