विद्यार्थ्यांनी भविष्याचा वेध घेऊन शिक्षणातील करिअर निवडावे : चंद्रकांत भाट

Spread the love

मयूर ज्ञानप्रबोधिनीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण

शिरोळ / प्रतिनिधी

शैक्षणिक क्षेत्रात अमुग्र बदल झाला आहे सध्या व्यावसायिक शिक्षणाला फार महत्त्व आले आहे.यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या भविष्याचा वेध घेऊन आपले पालक व गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊनच आपली कोणत्या क्षेत्रात आवड आहे.याचा विचार करूनच शिक्षणातील करिअर निवडण्याची गरज आहे असे प्रतिपादन पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले.

 

 

शिरोळ येथील मयूर ज्ञानप्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार व पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते प्राचार्य के एम भोसले हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.

 

 

१० वी नंतर ११ वी मध्ये विज्ञान व तंत्रज्ञान शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मयूर ज्ञानप्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती.या परीक्षेत शिरोळ ,जयसिंगपूर व कुरुंदवाड परिसरातील तब्बल ६०८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.त्यापैकी ५७४ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले.त्यांना ५००० रुपयेपासून २१००० रुपयापर्यंतची शिष्यवृत्ती देण्यात आली आली.

 

कार्यक्रमाचे स्वागत संचालक विक्रमसिंह भोसले यांनी तर प्रास्ताविक ॲड. प्रा.श्रीकांत माळकर यांनी केले.मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली दहावी नंतर काय ? या विषयावर प्रा. हुसेनी यांनी मार्गदर्शन केले.यावेळी ज्येष्ठ बालरोगतज्ञ डॉ.अतुल पाटील,राधा महिला फौडेंशनच्या अध्यक्षा जयश्री पाटील ,इम्रान कोठीवाले , आत्माराम मुळीक,सौ.वर्षा भोसले,जगदाळे मॅडम,सौ.पाटील मॅडम शिवाजीराव पाटील कौलवकर,पालक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!