नृसिंहवाडीत घरफोडीची; सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास

Spread the love
नृसिंहवाडीत भरवस्तीत घरफोडीची घटना; सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी केला लंपास..
नृसिंहवाडी / प्रतिनिधी
नृसिंहवाडी येथील भालचंद्र पुजारी यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली आहे.याबाबत भालचंद्र पुजारी यांनी शिरोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,भालचंद्र पुजारी हे काही कारणानिमित्त मुलगा निखिल पुजारी यांच्याकडे रत्नागिरी येथे सहकुटुंब गेले होते. घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडले. स्वयंपाकघरातून कपाटांच्या चाव्या घेऊन घेऊन सुमारे 15 हजार रोख,सोन्याच्या पादुका,टेंबे स्वामींची चांदीची नाणी अशा अंदाजे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला आहे.मागील दार उघडे असल्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी पलायन केले.घरातील सर्व वस्तू अस्ताव्यस्तपणे पसरल्या होत्या.अधिक तपास शिरोळ पोलीस करत आहेत.भर वस्तीत अशी चोरीची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.पोलिसांनी चोरीचा छडा लावून तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
error: Content is protected !!