कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील शिकलगार वसाहतीतून गेलेल्या सलगर-सदलगा महामार्गावर चौपदरीकरण झाल्याने वाहने ,अवजड वाहने भरधाव वेगाने येत-जात असतात गतीरोधक नसल्याने आणि याठिकाणी मोठी लोकवस्ती असल्याने अपघाताची मालिका सुरू आहे.या मार्गावर वसाहतीच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवावे अन्यथा आंदोलनाचा करण्याचा इशारा शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख वैभव उगळे यांनी जयसिंगपूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता तुषार शिरगुप्पे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
दरम्यान जिल्हाप्रमुख उगळे,माजी तालुकाप्रमुख दयानंद मालवेकर,गोपिनाथ शिकलगार,तानाजी शिकलगार, आदींच्या शिष्टमंडळाने भेट घेतली असता उपअभियंता शिरगुप्पे यांनी लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन दिले आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की,येथील शिकलगार
वसाहत बहायवळण रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.
महाराणा प्रताप चौक ते बस डेपो पर्यंतच्या रस्त्यावर वळणाचे व वस्तीचे दिशादर्शक फलक नाहीत.गतिरोधक नाहीत.
शहराचा हा बायपास रस्ता असून या रस्त्यावर अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते तर ऊस हंगामात ट्रॅक्टरची मोठी वाहतूक असते.याठिकाणी शिकलगार समाजाची 2 हजार लोकसंख्येची मोठी वस्ती आहेयाठिकाणी अपघात होऊन 10 हुन अधिक जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.तर अनेकांना अपंगत्व आले आहे.ही अपघाताची मालिका सुरू आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने सलगर-सदलगा मार्ग शहरात शिवतीर्थ पासून सुरू होतो आणि तेरवाड रस्ता स्वामिलजवळ समाप्त होऊन पुढे जोडला जातो. शहरातील अंतर्गत गल्ली रस्त्याच्या ठिकाणी ही गतिरोधक नसल्याने अपघात होत आहेत.
तरी या रस्त्यावर तात्काळ गतिरोधक बसवून पट्टे मारावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असे म्हटले आहे.
यावेळी सिकंदर शिकलगार, बाबू सिकलगार, अनिल शिकलगार,मोहन शिकलगार, स्वप्निल चव्हाण आदी उपस्थित होते.