जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सिद्राम कांबळे बिनविरोध

Spread the love

जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सिद्राम कांबळे तर उपसभापती पदी दऱ्याप्पा सुतार यांची निवड

जयसिंगपूर / प्रतिनिधी
जयसिंगपूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी सिद्राम दत्तु कांबळे,रा.नांदणी व उपसभापती पदी दऱ्याप्पा बाबू सुतार रा. दत्तवाड यांची बिनविरोध निवड झाली.बाजार समितीचे सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर सभागृहात संचालक मंडळाच्या बैठकीत सभापती व उपसभापती पदासाठी विशेष सभा घेण्यात आली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अनिल नादरे यांनी काम पाहिले.दरम्यान सभापती पदासाठी सिद्राम कांबळे यांचे नाव सुभाषसिंग रजपूत यांनी सुचविले व किरण गुरव यांनी अनुमोदन दिले व उपसभापती पदाकरीता दऱ्याप्पा सुतार यांचे नांव शिवाजी चव्हाण यांनी सुचविले त्यास महावीर पाटील यांनी अनुमोदन दिले.यावेळी सभापती उपसभापती पदासाठी सिद्राम कांबळे दऱ्याप्पा सुतार यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने या पदाच्या निवडी बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल नादरे यांनी जाहिर केले. निवडीनंतर नूतन सभापती सिद्राम कांबळे म्हणाले जयसिंगपूर बाजार समितीमधील सर्व संचालक व कर्मचारी यांना बरोबर घेवून शेतकरी,व्यापारी यांचा विकास साधला जाईल असे आश्वासन दिले.नुतन सभापती सिद्राम कांबळे व उपसभापती दऱ्याप्पा सुतार तसेच निवडणूक अधिकारी अनिल नादरे सहाय्यक निबंधक यांचा बाजार समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.या निवड सभेस संचालक, मुजमिल पठाण,रामदास गावडे,शिवाजी चव्हाण, महावीर पाटील,सुरेश माणगांवे,सौ.दिपाली चौगुले,सौ.माधुरी सावगांवे,चंद्रकांत जोंग,संजय अनुसे,आण्णासो पाणदारे,किरण गुरव, प्रविणकुमार बलदवा,दादासो ऐनापूरे,भगवान पाटील तसेच बाजार समितीचे सचिव सुनिल गावडे व कर्मचारी वर्ग यांच्यासह तालुक्यातील कार्यकर्ते,संस्था पदाधिकारी उपस्थित होते.संचालक विजयसिंह माने देशमुख यांनी प्रास्तावीक तर सुभाषसिंग रजपूत यांनी आभार मानले.
error: Content is protected !!