कुरुंदवाड / प्रतिनिधी
चाकाला पिशवीचा लागला धक्का,आणि दुचाकीवरील महिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली
शिरढोण (ता.शिरोळ) येथे उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरच्या चाकाला पिशवीचा धक्का लागून तोल गेल्याने पाठीमागे बसलेली महिला ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाली. शालन प्रकाश कलाल वय 50,रा.आसरा नगर इचलकरंजी)असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.संतोष प्रकाश कलाल(वय 24)याने पोलिसात वर्दी दिली आहे.
दरम्यान हा अपघात दर्गा चौकात झाल्याने रस्त्याच्या दुतर्फा रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघाताची माहिती सपने रविराज फडणीस यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बायपास रस्त्यावरून वाहतूक वळवत विस्कळीत वाहतूक सुरळीत केली.
कर्नाटक राज्यात पै-पाहुण्यांच्याकडे काम आटोपून संतोष प्रकाश कलाल(वय.24) हा आपली आई शालन कलाल यांना घेऊन आपल्या ताब्यातील दुचाकी हिरो स्प्लेडर क्र(एम.एच 09.ए. एम,0135)वरून शिरढोण मार्गे इचलकरंजीला जात असताना सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास दर्गाह चौकात समोरून उसाने भरलेला ट्रॅक्टर क्र(एम.एच 44,डी.4098)कुरुंदवाडच्या दिशेने जात असताना कलाल याच्या दुचाकींला साईडला अडकवलेली पिशवी ट्रॅक्टरच्या चाकाला लागून संतोष कलालचा तोल गेल्याने दुचाकी घसरून पडल्याने शालन कलाल ह्या ट्रॅक्टर ट्रॉलीच्या चाकाखाली सापडल्याने त्या जागीच ठार झाल्याचे वर्दीत म्हटले आहे.कुरुंदवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.