शिरोळात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन मेळावा
शिरोळ / प्रतिनिधी
जीवनात यशस्वी होण्यासाठी करिअर निवडण्याबरोबरच चांगले मार्गदर्शन केंद्र निवडून त्या दिशेने जायला हवे. ज्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी केली त्यांना जीवन समजून घेता आले. प्रतिकूल परिस्थितीत आपण कसे उभे राहतो, हे स्पर्धा परीक्षांच्या तयारी करताना आपल्याला समजते. कोणत्याही क्षेत्रात काम करताना धडपड केली नाही तर यशस्वी होवू शकत नाही.भविष्याचा वेध घेणारी वृत्ती आणि विश्वास असेल तर आयुष्यात उभे राहण्याची संधी प्राप्त होते असे विचार आदित्य ट्युटोरियलचे संस्थापक डॉ सी ए पवार यांनी व्यक्त केले.
येथील कल्लेश्वर मंदिराच्या सभागृहात आदित्य ट्युटोरियल व आँलिंपियाड स्कूल सांगली आणि रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ यांच्या वतीने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर व शैक्षणिक मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ते बोलत होते
या मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक आदित्य ट्युटोरियलचे चीफ कोऑर्डिनेटर प्रा आर एस ओक बोलताना म्हणाले की इयत्ता दहावी परीक्षानंतर अकरावी व बारावी हा टप्पा आपल्या जीवनात ध्येय निश्चित करणारा महत्त्वाचा टप्पा आहे.
त्यामुळे या दोन्ही वर्षात आपण कोणत्या क्षेत्रात जायचं याचा विचार करून मार्गक्रमण करणे गरजेचे आहे.यासाठी योग्य मार्गदर्शन केंद्राची निवड करणे महत्वाचे आहे.इंजिनिअरिंग मेडिकल सायन्स प्रवेश परीक्षा त्याचे नियोजन स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन यासाठी पालकांनी आपल्या मुलांनाही चांगल्या शैक्षणिक संकुलात दाखल करणे गरजेचे आहे.
आपल्या मुलाचे भविष्य घडविताना प्रत्येकाने विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडीचा विचार करून त्याला शैक्षणिक क्षेत्रात मार्गदर्शन करावे यासाठी आदित्य ट्युटोरियल व ऑलिंपियाड स्कूल नेहमीच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी उत्तम मार्गदर्शकाचे रात्रंदिवस काम करीत आहे.आदित्य ट्युटोरियलचे कोऑर्डिनेटर प्रा एस एस पाटील म्हणाले की जीवनात यशस्वी व्हायचे असेल विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कोणत्या विभागात प्रवेश घ्यायचा याचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा यासाठी आपल्या पालकांचे व योग्य मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.
शैक्षणिक क्षेत्रात झपाटाने बदल होत आहे ते बदल आपण आत्मसात करून योग्य ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत अभ्यासात सातत्य ठेवावे विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आदित्य ट्युटोरियल व आँलिंपियाड स्कूल नेहमीच तत्पर आहे.रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे अध्यक्ष संजय तुकाराम शिंदे यांनी स्वागत केले.सदस्य डॉ.अतुल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.प्रा.काशिनाथ भोसले यांनी आभार मानले.
ट्रेझरर संजय रामचंद्र शिंदे,सदस्य चंद्रकांत भाट,आदित्य ट्युटोरियलचे प्रा.गौरी गावडे,प्रा.कोडक,प्रा,कोळी, प्रा.वाघमोडे,प्रा.दळवी,प्रा.लक्ष्मण,प्रा. देसाई,निलेश,देसाई मॅडम,लूबना मॅडम,इतर सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह शिरोळ परिसरातील विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अरुणोदय चव्हाण यांनी केले.