सांगली / प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शब्दाला जागणारे राजकारणी म्हणून प्रसिद्ध आहेत.त्यांचा सांगली जिल्हा दौरा होता.इस्लामपूर येथे पक्षाच्या कार्यालयाचे उदघाटन त्यांच्या हस्ते होते.दिवसभर इतरही कार्यक्रमांची रेलचेल होती.असताना मिरज येथील आशा होमिओपॅथीचे डॉ.बजरंग भोसले यांनी कॅन्सर पिडीतांसाठी होमिओपॅथी औषध उपचार पद्धतीचा वापर करण्यासाठी युनिट सुरु केले आहे.या युनिटचे उदघाटन अजितदादांच्या हस्ते व्हावे अशी त्यांची तळमळ होती.त्यासाठी त्यांनी अजितदादांना विनंती ही केली होती.अजितदादांनी वेळात वेळ काढून येऊन जातो असा शब्द डॉ.भोसले यांना दिला.आणि ते शब्दाला जागलेही.अजितदादा यांनी राष्ट्रवादीमध्ये आपला गट वेगळा केल्यानंतर सांगली जिल्ह्यातला त्यांचा हा पहिलाच दौरा होता.मिरजेमध्ये प्रथमच त्यांचा दौरा झाला.अजितदादांनी कोणताही राजकीय कार्यक्रम मिरजेमध्ये घेतला नाही.त्यांनी फक्त भोसले बंधूंच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या हॉस्पिटलच्या उदघाटनासाठी वेळ दिला.अजितदादांचा दौरा व्यस्त होता.वेळ अजिबात नव्हता तरीही त्यांनी डॉ. भोसले यांना दिलेला शब्द पाळण्यासाठी रात्री उशिरा आपला मोर्चा मिरजेकडे वळविला.अचानकपणे अजितदादा आणि त्यांच्याबरोबरचे सहकारी त्यांच्या गाड्या रात्री १० च्या सुमारास डॉ.भोसले यांच्या आशा होमिओपॅथी समोर उभा राहिला.दादा उतरले अवघ्या १० ते १५ मिनिटात त्यांनी कॅन्सर युनिटचे उदघाटन केले. त्यांच्यासोबत क्रीडामंत्री संजय बनसोडे,पालकमंत्री ना. सुरेशभाऊ खाडे होते.राजू भोसले, संजय भोसले यांनी स्वागत केले.