शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले नागरिकांच्या सोयीसाठी मदत कक्षाची स्थापना करण्यात आली.
शिरोळ नगरपालिकेचा ६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.पालिकेच्या आवारात रांगोळी काढण्यात आली होती.सकाळी पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.नागरिकांचा वेळ वाचावा त्यांची कामे जलद गतीने व्हावीत यासाठी पालिकेत मदत कक्षाची स्थापना वर्धापन दिनानिमित्त करण्यात आली. पालिकेचे लिपिक ज्ञानेश्वर कंदले यांची या मदत कशासाठी नेमणूक करण्यात आली आहे.यावेळी माजी नगरसेवक प्रकाश गावडे,तातोबा पाटील,आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे,माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आरगे,सामाजिक कार्यकर्ते जनार्दन कांबळे, पालिकेचे लेखपाल हरीपांडू कामून,लिपिक अमोल बन्ने, मलिकार्जुन बल्लारी,विनायक लोंढे,ज्ञानेश्वर कंदले,पोपट आदके,गणेश केंगारे,प्रशांत आवळे,स्नेहल कोळी, प्रभावती बाबर,मुकादम रायफल कांबळे,आरोग्य विभागाचे कॉन्ट्रॅक्टर सर्जेराव पुदें यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.