कुरुंदवाड कृष्णा वेणी यात्रा लोकसहभागातून पार पडणार

कुरुंदवाड / प्रतिनिधी

कुरुंदवाड येथे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर भरणाऱ्या कृष्णा वेणीची यात्रा पालिका प्रशासन आणि सार्वजनिक मंडळाच्या लोकसहभागातून पार पाडण्याचा ठराव करण्यात आला.यात्रेबाबतच्या विविध विषयावरून प्रशासक आणि नागरिकांच्यात शाब्दिक चकमक झाली.यावर्षीच्या यात्रेसाठी सार्वजनिक मंडळाचा लकी ड्रॉ पद्धतीने चिट्ठी काढण्यात येणार असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अशीश चौहान यांनी सांगितले.

 

 

कुरुंदवाड पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास यात्रेच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित करण्यात आली होती.अध्यक्षस्थानी प्रशासक तथा मुख्याधिकारी चौहान होते पोलीस उपनिरीक्षक सागर पवार प्रमुख उपस्थित होते.पालिकेच्या कर विभागाचे निशिकांत ढाले यांनी मागील वर्षाच्या इतिवृत्तासह जमा खर्चाचे वाचन केले.

 

 

यात्रा भरविण्यात येणाऱ्या शिवतीर्थ ते कृष्णा घाटापर्यंतच्या आरक्षित शेती बाबत मुंबई उच्च न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे.22 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.या सुनावणीनंतर यात्रा कुठे भरवायची याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी चौहान यांनी सांगितले.तथापि मुख्याधिकारी चव्हाण यांनी शहराचा कर आणि यात्रेतील जागेच्या भाड्याची रक्कम काही दुकानदाराची थकीत असल्याचा उल्लेख करताच माजी नगरसेवक राजू आवळे यांनी उत्तर-प्रत्युत्तर देत प्रश्नाची मालिका सुरू केली.

 

यावरून पालिकेचे कर्मचारी आनंदा शिंदे यांनी सभागृहात शांतता राखा अन्यथा आम्ही काम बंद करू असा इशारा देताच माजी नगरसेवक अनुप मधाळे सह नागरिक संतप्त झाले.आणि एकच गोंधळ उडाला. त्यामुळे सभागृहात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.उपनिरीक्षक पवार यांनी सर्वांना शांततेचे आवाहन करत कर्मचारी शिंदे यांना सभागृहातून बाहेर जाण्यास सांगितले.आणि सभेला सुरवात झाली.

 

 

यावेळी शहरातील 50 हुन अधिक मंडळांनी एकत्रित येत शिरोळच्या धरतीवर यात्रा साजरी करण्याची केलेली संकल्पना माजी नगरसेवक प्रा.सुनील चव्हाण यांनी मुख्याधिकारी यांच्यासमोर मांडत त्याबाबतच्या अटी शर्ती आणि यात्रा साजरी करण्याच्या नियमावली सांगितली. प्रशासक चौहान यांनी ग्रीन सिग्नल देत सार्वजनिक मंडळ आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने ही यात्रा साजरी करण्यासाठी परवानगी दिली.

 

 

 

लवकरच सार्वजनिक मंडळाच्या लकी ड्रॉ पद्धतीने चिठ्ठी काढून त्या मंडळाकडे यात्रेचे संयोजन दिले जाणार असल्याचे सांगितले.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव उगळे,बाबासाहेब सावगावे,दयानंद मालवेकर,उदय डांगे,अक्षय आलासे, अनुप मधाळे,जितेंद्र साळुंखे,तानाजी आलासे,जय कडाळे,बबलू पवार,गौतम ढाले,सुनील कुरुंदवाडे,आयुब पट्टेकरी,आर आर पाटील आदींनी सूचना मांडल्या.

 

 

यावेळी प्रवीण खबाले,रघु नाईक, उमेश कर्नाळे,रमेश भुजुगडे,बापूसाहेब आसंगे,दीपक परीट,सुरेश बिंदगे, महावीर आवळे,शाहीर आवळे,अभय पटूकले,आप्पा बंडगर,दिलीप बंडगर,लियाकत बागवान,मिलिंद गोरे, गुलाब ढालाईत,रणजित डांगे,अजीत देसाई,गणेश गुरव आदी उपस्थित होते.

चौकट

एक वर्षासाठी यात्रेसाठी मंडळाचा सहभाग.
कुरुंदवाड पालिकेवर सध्या प्रशासक असल्याने यावर्षीची यात्रा प्रशासक आणि मंडळाच्या संयुक्त विद्यमाने पार पडणार आहे पुढच्या वर्षी पालिकेचे लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आल्यास त्यावेळी यात्रा भरवण्याबाबत चा निर्णय त्या सभागृहाचा असेल असे प्रशासक तथा मुख्याधिकारी अशीश चौहान यांनी स्पष्ट केले.

Spread the love
error: Content is protected !!