स्वाभिमानी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष पदी कॉ.जयश्री पाटील यांची निवड

Spread the love

अब्दुललाट /प्रतिनिधी

 

श्रमशक्ती परिवाराच्या कार्यकारी संचालिका,कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी यूनियन च्या नेत्या कॉ.जयश्री पाटील यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी माजी खासदार राजू शेट्टी यांनी निवड केली.अब्दुललाट येथे एका कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांना निवडीचे पत्र देऊन अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली.या प्रसंगी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले कि, जयश्री पाटील यांची निवड करीत असताना आम्हाला आनंद होत आहे.

 

आज पर्यंत जयश्री पाटील यांनी श्रमशक्ती परिवार आणि इतर संघटनाद्वारे समाजातील श्रमिक कष्टकरी वर्गाच्या उन्नती साठी संघर्ष केलेला आहे.इथून पुढील काळात त्या स्वाभिमानी महिला आघाडीचे काम ह्याच जोमाने करीत याचा आम्हाला विश्वास वाटतो.या प्रसंगी कॉ.जयश्री पाटील यांनी आपल्या मनोगतात म्हणाल्या कि, मा खा राजू शेट्टी साहेबांनी ज्या विश्वासाने जबाबदारी दिलेली आहे.त्या बद्दल त्यांची आभारी आहे.

 

 

गेल्या पंचवीस वर्षात सामाजिक जीवनात काम करीत असलेल्या कामाचा अनुभव हि जबाबदार पार पाडताना उपयोगात येईल, जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून महिलांच्या प्रगतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार असल्याचे सांगितले, यावेळी कॉ.जयश्री पाटील यांच्या निवडीमुळे त्याचे सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे. या कार्यक्रमास प्रा.जालिंदर पाटील सर, सचिन शिंदे, सागर शंभूशेट्टी यांच्यासह स्वाभिमानीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!