अजरामर !
दाखवण्या दोष माझे ;
मागे कुणी उरु नका !
उणीवा दाखवा समोर माझ्या; मागे किरकिर करु नका!!१!! चुकतही असेन मी अनेकदा;
तर बोट माझे धरु नका !
गोड बोलूनी घात होतसे ;
उगाच मागे मागे फिरु नका !!२!!
माणूसच आहे मी ही;
नेहमी मज स्मरु नका! पडणार आहे उपयोगी ;
हे मात्र कधीच विसरु नका !!३!! अपेक्षांचे घेऊन ओझे ;
कुणाकडे हात पसरु नका ! हात जोडूनी विनवितो ; अपमानित होऊन झुरु नका !!४!!
गिरविण्या स्वावलंबनाचे धडे; मागे कधी सरु नका !
अजरामर होण्या गाजवु कीर्ती; उगाच पशुसम मरू नका !!५!!
कवी: डॉ कुमार पाटील
शिरढोण
8788712110