कुरुंदवाड / प्रतिनिधी
हेरवाड येथील चौगुले मळ्यातील उसाच्या फाडला आग लागून.40 एकरातील ऊस जळून खाक झाला ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या आगीमध्ये शेतकऱ्यांचे ठिबक,केबल वायरिंग यासह पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपा जळाल्याने अंदाजे 10 लाखाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
हेरवाड चौगुले माळ्यात उस तोड सुरू होती.अचानक एका क्षेत्राला अचानक आग लागली आगीने पाहता-पाहता रौद्ररूप धारण करत परिसरातील सुमारे 40 एकर ऊस जळून खाक झाला. या आगीत शेतकरी स्वप्नील चौगुले, रावसाहेब चौगुले, रमेश आलासे,महावीर पाटील, बी.के. पाटील, विजय आलासे, श्रीकांत माळी, अभय आलासे, प्रवीण आलासे, दादा आलासे, बंडू परीट, अंकुश माळी, तुकाराम माळी, सौरभ चौगुले आदी शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान आलासे यांची एकमेका लगतच शेती आहे. गेल्याच वर्षी सोसायटीचे कर्ज काढून ठिबक सिचन पाईप लाईन करण्यात आली होती.या आगीत ती भक्ष्यस्थानी पडली.लगतच जनावरांचा गोठा होता.25 हुन अधिक जनावरे होती.आग लागल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांनी जनावरे सोडवून सुखरूप ठिकाणी नेऊन बांधली त्यामुळे अनर्थ टळला.
आग टोक्यात आणण्यासाठी गुरुदत्त साखर कारखाना,दत्त सहकारी साखर कारखाना, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाने प्रयत्न केले.