कुरुंदवाड / प्रतिनिधी
खिद्रापूर ता.शिरोळ ग्रामपंचायत मालकीच्या शाळा इमारत विकासासाठी 12 लाखाचा निधी मंजूर झाला आहे.निधी प्राप्त करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून मागणी दिलेल्या मार्गदर्शनानुसार शाळेच्या असेसमेंट उताऱ्यावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव आवश्यक असल्याने त्यांचे नाव लावण्यासाठीचा ठराव केल्याची माहिती.सरपंच सारिका कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान उर्दू शाळेच्या विकास त्याजागेच्या असेसमेंट उताऱ्यावरही मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे नाव लावल्यानंतर निधी प्राप्त झाला. त्याच धर्तीवर मराठी शाळेच्या असेसमेंट उताऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे नाव लावून इमारतीचा विकास झाल्यानंतर असेसमेंटवर पुन्हा खिद्रापूर ग्रामपंचायतीचे नाव लावण्यात येणार आहे.विरोधकांनी याची पूर्ण माहिती न घेता आरोप केल्याचे सरपंच कदम यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत पुढे बोलताना सरपंच कदम म्हणाल्या भाजपच्या आमदार श्वेता महाले ह्या कोपेश्वर मंदिराला दर्शनासाठी आल्या होत्या.त्यांनी मराठी शाळा इमारतीच्या दुरुस्तीसाठी 12 लाखाचा निधी जाहीर केला.यासाठी आणखीन निधी आवश्यक असल्याने पालकमंत्री हसन मुश्रीफ, तालुक्याचे आमदार डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि खास.धैर्यशील माने यांच्याशी ही चर्चा करण्यात आली आहे.असे सांगत सरपंच कदम बोलताना पुढे म्हणाल्या मागील सभागृहात शौचालय बांधकाम,कॉम्प्युटर खरेदी आणि अंगणवाडी चे वीज बिल भरण्याचा सन 2022-23 सालात तत्कालीन सरपंच हैदरखान मोकाशी आणि ग्रा.प सदस्यांनी ठराव केला आहे.त्या ठरावाच्या खर्च मंजुरीचा विषय परवा झालेल्या गावसभेपुढे वाचन करण्यात आले आहे.ग्रामस्थांनी या खर्चाबाबत कामे झालीच नसल्याचा आरोप केला आहे.त्यामुळे ग्रामस्थांच्या मागणीनुसार याबाबतची खातेनिहाय चौकशी व्हावी यासाठी गटविकास अधिकाऱ्यांना पत्र देऊन चौकशी झाल्याशिवाय खर्चाला मंजुरी देणार नसल्याचे सांगितले.
प्रशासकीय अधिकारी म्हणून कोणताही चुकीचा ठराव होऊ देणार नाही.शाळेच्या विकासनिधीसाठी ठराव करण्यात आला आहे..चुकीचा कोणता ठराव केल्यास निलंबनासारख्या कारवाईला मला सामोरे जावे लागेल
रवींद्र वैरागी ग्रामसेवक खिद्रापूर ग्रामपंचायत