शरद कृषिकन्यांकडून शेतीविषयक मोबाईल ॲपचे मार्गदर्शन

जुने दानवाड / प्रतिनिधी

आजचे युग हे माहिती तंत्रज्ञानाचे आहे.लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांच्या हाती स्मार्टफोन आणि त्यात वेगवान इंटरनेट सेवा आलेली आहे.शेतकरीदेखील बदलत्या तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये अवलंब करत आहेत. त्यासाठी काही कृषिविषयक माहिती देणारे ॲप शेतीसाठी उपयुक्त ठरत आहेत.

 

शेतकऱ्यांना या ॲपचा वापर वापर कसा करावा याबाबत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषी महाविद्यालय,जैनापूर येथील कृषिकन्या तेजस्विनी खोले, रसिका पाटील,ऋतिका पाटील,योगिता पुजारी,तेजस्विनी रजपूत,सोनाली रोकडे यांनी जुने दानवाड येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

जुने दानवाड येथील शेतकऱ्यांना किसान सुविधा,ई- नाम,बीजक,ॲग्री ॲप, भारत ॲग्री कृषिदुकान,फार्मर्स ई- मार्केट अशा कृषीसंबंधित ॲप्सचा वापर कसा करावा याबाबत कृषिकन्यांनी माहिती देऊन त्याच्या वापरास प्रोत्साहन दिले.या ॲप्सच्या माध्यमांतून शेतकऱ्यांना पिक लागवडीपासून,काढणी ते मार्केटिंगपर्यंतचे सर्व टप्यातील मार्गदर्शन घरबसल्या मिळणार आहे.

 

या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील व उपप्राचार्य व कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस. एच.फलके,कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.टी.कोळी कार्यक्रम अधिकारी,प्रा.पी. व्ही.आवळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Spread the love
error: Content is protected !!