आजी माजी सैनिकांचे समाजाप्रती आदर्शवत कार्य : अमरसिंह पाटील

शिरोळ आजी-माजी सैनिक संघटनेचा वर्धापन दिन उत्साहात

शिरोळ / प्रतिनिधी

आपल्या जीवाची पर्वा न करता देश रक्षणासाठी आपले आयुष्य खर्ची घातले सेवानिवृत्तीनंतर तेच माजी सैनिक समाजाच्या प्रगतीसाठी झटत आहे.या सैनिकांच्या कार्याचा सर्वांनाच सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी केले.
आजी माजी सैनिक संघटना शिरोळ या संघटनेचा २९ वा वर्धापनदिन संघटनेच्या कार्यालयात साजरा करण्यात आला.यावेळी माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे बोलत होते.श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलराव यादव हे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्व विद्यालय शिरोळ केंद्राच्या संचालिका मनिषा बहनजी,अर्चना बहनजी,कोल्हापूर जिल्ह्या सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष संजय माने,शिरोळ आजी-माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष संजय इंगळे,सर्व सदस्य व सैनिक महीला-गटाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली उपस्थित मान्यवरांचा संघटनेच्यावतीने सत्कार करण्यात आला सैनिक महीला गटाच्या अध्यक्षा भारती आरदाळे , सदस्या सुवर्णा इंगळे मोहन कोगे सुधाकर आरदाळे शंकर मेथे संपत इंगळे दिनकर घाडगे शहाजी काळे यांच्यासह तालुक्यातील सर्व सैनिक संघटनाचे पदाधिकारी जयसिंगपूर ,टाकळीवाडी, गणेशवाडी दत्तवाड कुरुंदवाड या परिसरातील माजी सैनिक उपस्थित होते या सर्वाचा सत्कार करण्यात आला सैनिक संघटना शिरोळ अध्यक्ष संजय इंगळे यांनी संघटनेचा इतिहासाबदल माहीती सांगितली शेवटी राट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली

Spread the love
error: Content is protected !!