शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहर व परिसरात भारतीय प्रजासत्ताक दिन अमाप उत्साहात साजरा करण्यात आला विविध ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले
प्रजासत्ताक दिनानिमित्त शुक्रवारी पहाटेपासूनच देशभक्तीपर गीत लावल्याने वातावरण उत्साहीत झाले होते श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन उद्यानपंडित गणपतराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले कारखान्याचे कार्यकारी संचालक एम व्ही पाटील सर्व संचालक अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते येथील तहसील कार्यालयातील सार्वजनिक ध्वजारोहण तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांच्या हस्ते झाले यावेळी अधिकारी कर्मचारी व स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय विविध क्षेत्रातील मान्यवर विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तहसील कार्यालयाच्या वतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला
शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयात प्रशासक तथा गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी ध्वजारोहण केले यावेळी अधिकारी कर्मचारी तालुक्यातील माजी आजी लोकप्रतिनिधी उपस्थित होते शिरोळ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सर्व पोलीस कर्मचारी उपस्थित होते शिरोळ नगरपरिषद कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले नगरपालिकेचे माजी नगरसेवक शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर आजी-माजी लोकप्रतिनिधी विद्यार्थी माजी सैनिक संघटना व नागरिक पालिकेचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते संगमनगर येथील ध्वजारोहण भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा पूर्व ग्रामीणचे अध्यक्ष डॉ अरविंद माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
शिवाजी चौकातील सार्वजनिक ध्वजारोहण पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी केले पद्माराजे विद्यालयाच्या एनसीसीच्या विद्यार्थ्यांनी ध्वजवंदना दिली.शिरोळ शहरातील शासकीय निमशासकीय कार्यालय सहकारी बँका पतसंस्था दूध संस्था विकास सेवा संस्था सार्वजनिक तरुण मंडळ माध्यमिक प्राथमिक विद्यालय या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त उत्साहात ध्वजारोहण समारंभ पार पडला अनेक शाळेतील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले.प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरात अनेक ठिकाणी जिलेबीचे स्टॉल लावण्यात आले होते जिलेबी खरेदी करण्यासाठी नागरिकांची स्टॉलवरती झुंबड उडाली होती अनेक ठिकाणी लाऊड स्पीकर स्टेरिओ यावरती देशभक्तीपर गीत प्रसारित करण्यात आल्याने प्रत्येकाच्या मनात देश प्रेमाची भावना जागृत झाली होती प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक ठिकाणी रक्तदान शिबिरासह सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शिरोळ शहर व परिसरात सर्वत्रच उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा झाला.