कुरुंदवाड / प्रतिनिधी
येथील महाशिवरात्रीनिमित्त सालाबाद प्रमाणे भरविण्यात येणाऱ्या यात्रेच्या संदर्भात शहरातील सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी आणि नागरिकांना निमंत्रित करून यात्रा कोणत्या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.याबाबत चर्चा करण्यासाठी गाव सभा बोलविण्यात यावी अशी मागणी कुरुंदवाड शहर बचाव कृती समिती तर्फे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.प्रशासक तथा मुख्याधिकारी आशिष चौहान यांना निवेदन देण्यात आले आहे.दरम्यान गेल्या चार-पाच वर्षांपासून महाशिवरात्री यात्रा भरत असलेल्या जागेबाबत मुंबई उच्च न्यायालयात वाद सुरू असून यात्रा कोणत्या जागेत भरवायची हा ज्वलंत प्रश्न असल्याने गाव सभेमध्ये काय? निर्णय होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.शहर बचाव कृती समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर 8 मार्चला कृष्णा वेणी यात्रा भरवण्यात येते.येथील कृष्णा घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यालगतच्या शेतीतील ऊस गळीतास गेला असल्याने सदरच्या शेतजमिनी खुल्या आहेत या शेतजमिनीत यात्रा भरविण्याच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना गाव सभेत निमंत्रित करून चर्चा करण्यात यावे.शिरोळ येथील बुवाफन यात्राही तेथील मंडळांना रोटेशन पद्धतीने साजरी करण्यासाठी प्रत्येक वर्षी आयोजन दिले जाते त्या धरतीवर कुरुंदवाड शहराची यात्रा ही शहरातील मंडळांना आयोजन दिले जावे.यासाठी गाव सभेला मंडळांनाही निमंत्रित करावे.आणि यात्रेला व्यापक स्वरूप मिळवण्यासाठी यात्रा विकास आराखडा तयार करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदनावर सुनील कुरुंदवाडे,अभिजीत पवार,सिकंदर सारवान,
आप्पासाहेब भोसले, रियाज शेख, शैलेश व्होरा, संभाजी घोरपडे, बाबुराव कोळी, मुनीर पटवेगार आदींच्या सह्या आहेत.