चेहऱ्यावर लालसर फोड येतात काही दिवसांनी ते पसयुक्त होतात यालाच पिंपल (तारुण्यपिटीका) म्हणतात.
लक्षणे –
फोड उटणे, फोड फुटल्यानंतर खड्डा पडणे, फोड दुखणे, फोड पस ने भरणे, काळे डाग पडणे हि सर्व लक्षणे सामान्यता: आढळतात.यामध्ये पित्त दोष रक्तदूष्टी करतो.
अपथ्य (काय खाऊ नये )-
पित्तकारक, उष्णतावर्धक आहार, चहा, पोहे, काजू, शेंगदाणे, वाळलेले खोबरे, नॉनव्हेज, तूर डाळ, मोहरी, तिळ, काळी मिरी, लवंगा, गव्हाचे अन्न, दही, पापड, लोणचे, मुळा, अळू, ग्रेव्ही, फणस, वांगी, बटाटा.
पथ्य (खावे )-
ज्वारीच्या कन्या, ज्वारीच्या लाह्या, तूप, लोणी, ताक, ज्वारीची /तांदळाची भाकरी, सफरचंद, चिकू, डाळिंब, पेरू, काकडी, बिट, गाजर, दुधीभोपळा, पडवळ, दोडका, भात,भेंडी, गवारी, मुगडाळ, कारले, शेवगा, घेवडा.
आयुर्वेदिक उपचार –
विरेचन, स्नेहन, रक्त मोक्षण
आयुर्वेदिक कल्प (औषधी )-
महामंजिष्ठादी काढा, सारिवाद्यासव, पंचतिक्त घृत.
उपाय –
1) रात्री जागरण व दिवसा झोपू नये.
2 )चेहऱ्याची त्वचा नाजूक असल्याने येथे केमिकल युक्त साबण वापरण्याऐवजी, अंघोळीपूर्वी खोबरेल तेल लावावे व मसूर डाळीच्या पिठाने घासून चेहरा धुवावा.
3) चंदन, आंबेहळद, साधी हळद, जायफळ, जेष्ठमध, वेखंड, कडुनिंब हे सर्व दुधात उगळून चेहऱ्यावर रात्री लेप करावा व सकाळी धुवून काढावा.
4) दररोज सकाळी -संध्याकाळी चेहरा त्रिफळा चूर्ण चा काढा बनवावा व त्याने धुवावा.
5) सारिवा, त्रिफळा,पित्तपापडा,मंजिष्टा,पटोल,गुडूची, यष्टीमधू,मुक्ता शुक्ती भस्म,मौक्तिक कामदुधा सर्व गोष्टी एकत्रित करून गरम पाण्यातून सकाळी व रात्री 2-2 चमचे घ्यावे.
6) शक्य असेल तर कडुलिंबाच्या पानांचा रस /आता मार्केट मध्ये कडुलिंबाच्या गोळया सुद्धा मिळतात त्या सकाळी व रात्री 2-2 खाव्या.
7) दररोज न चुकता मनुके खावेत (उष्णतारोधक तसेच मृदू विरेचक म्हणून काम करते )
8) गुलकंद देखील यात आरोग्यदाई आहे.
9) दररोज हराटीचा रस 1 ग्लास प्यावा
10) गव्हांकुर रस देखील उष्णता कमी करून, चेहऱ्यावरील मुरूम गायब करतो.
11) मलावस्तंभ असेल तर 1 चमचा एरेंडेल तेल, दुधासोबत घ्यावे, याने पोट साफ होते व पित्ताचा त्रास होत नाही.
12) रक्त मोक्षण उपचारासाठी चेहऱ्यावर जळू लावावेत, ते दूषित रक्त शोषून घेतात व काही दिवसातच
चेहऱ्यावरील मुरूम, फोड, पिंपल्स समूळ नष्ट होतात.
13) दररोज योगा आसन करावेत, याने शरीर व मन दोन्ही प्रसन्न राहते.
डॉ.ओंकार अशोक निंगनुरे.
कृष्णा आयुर्वेदिक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घोसरवाड.
संपर्क -9175723404,7028612340