बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सकस आहार व पुरेसा व्यायाम आवश्यक – बालरोगतज्ञ डॉ.अतुल पाटील

केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोळ यांच्या वतीने शालेय मुलांचे आरोग्य निरोगी राहावे यासाठी बदलती जीवनशैली व मुलांच्या आरोग्याची काळजी या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते.याप्रसंगी शिरोळ येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ अतुल पाटील यांना व्याख्यानासाठी निमंत्रित करण्यात आलेले होते.

 

डॉ अतुल पाटील यांनी बोलताना लहान मुलांशी समरस होत प्रथमतः मुले सध्या जी जीवनशैली आत्मसात करीत आहेत त्याचा आढावा घेतला त्यात कळत नकळत होणाऱ्या चुकांची मुलांना जाणीव करून दिली.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा दिनक्रम कसा असावा ; आहार कसा असावा.

 

आहारात फळे पालेभाज्या डाळी कडधान्ये कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ यांचे फायदे समजावून सांगितले व त्यांचा नियमित आहारात वापर कसा असावा ; मैदानी खेळाचे महत्व काय असते याबद्दल मार्गदर्शन केले. त्याबरोबरच सध्या मुले मोबाइल व टीव्ही च्या जास्त आहारी गेले आहेत.

 

त्याचा त्याच्या शारीरिक – मानसिक बौद्धिक विकासावर कसा परिणाम होतो याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले. सर्वांना आवडणाऱ्या बेकरी पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने शरीरावर होणारे दुरोगामी परिणामांवर भाष्य केले.उपस्थित मुलांच्याकडून सकस आहार घेण्याबद्दल,बेकरी पदार्थ खाने टाळणेबद्दल, टीव्ही मोबाईलचा गरजेपुरता वापर करणे तसेच पुरेसा व्यायाम करण्याबद्दल प्रतिज्ञा करवून घेतली.

 

डॉ अतुल पाटील यांनी हसत खेळत लहान मुलांच्या मनातील भावना समजून घेत शालेय मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी तसेच बदलत्या जीवनशैली व वेगवेगळ्या आजारांच्या साथींच्या अनुषंगाने कशी काळजी घ्यावी याबद्दल अनमोल अशी माहिती मुलांना दिली.
सदर कार्यक्रमाचे आयोजक केंद्रीय प्राथमिक शाळा दत्तनगर शिरोळच्या मुख्याध्यापिका वहिदा नदाफ  शरद सुतार यांनी केले.

 

तर कार्यक्रमाप्रसंगी सौ अनुराधा शिनगारे,श्रीमती छाया साबळे,सौ लोटे पाटील,सौ शबाना मुल्ला,सौ विद्या पाटील मॅडम व सौ माने मॅडम आदी शिक्षक वृंद उपस्थित होता व शाळेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love
error: Content is protected !!