जयसिंगपूर / प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मुंबई येथील जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी चलो मुंबईची हाक देण्यात आली आहे 24 जानेवारी जयसिंगपूर येथून 100 गाड्या व तालुक्यातून 500 गाड्या रवाना होणार असून मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी होणार आहेत. सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.अध्यक्षस्थानावरुन बोलताना कोल्हापूर जिल्हा मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महिपती बाबर म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी मुंबई येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या क्रांतीकारक आंदोलनात पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून मोठ्या संख्यने समाजबांधव एकत्रित येवून सहभागी होणार आहेत. 24 जानेवारी सकाळी सहा वाजता शिरोळ तालुका मराठा भवन येथून सर्व गाड्या मुंबईकडे रवाना होणार आहेत. तालुक्यातील प्रत्येक गावातील समाजबांधवांनी आपल्या वाहनांसह 24 जानेवारी सकाळी सहा वाजता जयसिंगपूर येथील मराठा भवनाजवळ एकत्रित जमण्याचे आहे.तसेच 23 जानेवारी रोजी जयसिंगपूर येथे पुन्हा बैठक होणार आहे. या बैठकीत झालेली तयारी व रूपरेषा ठरविण्यात येईल.माजी नरगसेवक सर्जेराव पवार म्हणाले, मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनप्रश्नी जयसिंगपूरसह तालुक्यातील गावामधये जनजागृती सुरु आहे. पहिल्या टप्प्यात पुणेपर्यंत आपल्याला जावून तेथून रॅलीत सहभागी व्हायचे आहे. प्रत्येक गावातून 10 ते 20 गाड्या कशा जातील याचे नियोजन करावे लागणार आहे. प्रत्येकांनी आपल्या राहण्याची व जेवणाची सोय करावी लागणार आहे. याचे नियोजन करावे लागणार आहे
शिरोळ तालुका मराठा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले, मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला समाजबांधवांनी पाठींबा दर्शविण्यासाठी मुंबईला यावे. चलो मुंबई अशी हाक देत आरक्षणाच्या आर या पार लढाईत सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष डी.आर.खामकर, अभिजित भांदिगरे, डॉ.अतुल पाटील, रणजितसिंह पाटील, धनाजी चुडमुंगे, बजरंग खामकर,दिलीप माने, स्वाती भापकर यांनी मनोगते व्यक्त केली.
बैठकीस माजी नगराध्यक्ष बाळासाहेब भांदिगरे, निता माने, राजन वाले, रणजित महाडिक, पिंटू खामकर, पराग पाटील, बंडा मिणीयार, तेजस कुराडे, राहूल पाटील, अजित पवार, अक्षय पाटील, संजय चव्हाण, रणजित घोरपडे, विनोद मुळीक, प्रकाश पवार, राजू जाधव यांच्यासह मराठा समाजबांधव उपस्थित होते.