जुने दानवाड / प्रतिनिधी
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असणाऱ्या शरद कृषि महाविद्यालय, जैनापुर येथील अंतिम वर्षातील विद्यार्थिनीनी ग्रामीण कृषि जागरूकता, कृषी कार्यानुभव आणि कृषि औद्योगिक कार्यक्रम अंतर्गत जुने दानवाड येथील महिलांना दुधापासून पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक देऊन मार्गदर्शन केले.
अत्यंत पौष्टिक आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडीचा पदार्थ म्हणजे पनीर. प्रोटीन्स, कॅल्शियम आणि कॅलरीजचे प्रमाण पनीरमध्ये अधिक असलेने याच आहारात समावेश असणे आवश्यक आहे . हीच गरज ओळखून घरच्या घरी दुधापासून पनीर बनविण्याचे प्रात्यक्षिक येथील महिलांना दाखविण्यात आले.
यावेळी कृषिकन्या तेजस्विनी खोले, रसिका पाटील, ऋतिका पाटील, योगिता पुजारी, तेजस्विनी रजपूत, सोनाली रोकडे उपस्थित होते.या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एस.जे पाटील,उपप्राचार्य आणि कार्यक्रमाचे प्रमुख प्रा.एस.एच.फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ.आर.टी कोळी व कार्यक्रम अधिकारी प्रा.पी.व्ही.आवळे, विषय शिक्षक एस.वी.चव्हाण यांचे मार्गदर्शन लाभले.